Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Pawar : शरद पवार गटात नाराजीनाट्य; शेकडो कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा

Sharad Pawar : शरद पवार गटात नाराजीनाट्य; शेकडो कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का

रावेर : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असले तरी शरद पवार गटाकडून अद्याप काही जागांवर उमेदवार घोषित करण्यास विलंब होत आहे. याचा ताण असतानाच आता रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का बसला आहे. रावेर मतदारसंघातून भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर तगड्या उमेदवाराच्या शोधात शरद पवार गटाने नुकतीच उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, यामुळे पवारांचे कार्यकर्ते नाराज झाले असून शेकडोंनी राजीनामे दिले जात आहेत.

माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र चौधरी (Santosh Chaudhary) यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल या तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे रावेरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता संतोष चौधरी नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -