Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व रस्ते वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने रेल्वे उड्डाणपुलाचे (ROB) बांधकाम सुरू आहे. सुमारे २५.१७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला बुरहानपूर (Burhanpur) परिसरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये स्थान आहे. हा रेल्वे उड्डाणपूल बुरहानपुर (लालबाग) रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-खंडवा विभागातील (Bhusawal-Khandwa Section) रेल्वे किलोमीटर ४९७/३३ ते ४९८/०१ दरम्यान उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील (Railway crossing) रस्ते वाहतूक सुरळीत होऊन प्रवासी, स्थानिक नागरिक तसेच परिसरातील वाहनांना मोठा फायदा होणार आहे.
Nashik : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, स्वच्छता, ...
भुसावळ-खंडवा रेल्वेमार्ग धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा
बुरहानपुर रेल्वे उड्डाणपुलाची (Burhanpur Railway Flyover) योजना केवळ सध्याच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊनच नव्हे, तर भुसावळ-खंडवा रेल्वेमार्गावर (Bhusawal-Khandwa Railway Line) भविष्यातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या विकासाचा विचार करून करण्यात आली आहे. भुसावळ-खंडवा रेल्वेमार्ग हा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असून, अतिरिक्त मार्गिकांमुळे रेल्वे वाहतूक क्षमता वाढविणे, गाड्यांचे सुरळीत संचालन करणे आणि वाढत्या वाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. प्रकल्पांतर्गत आवश्यक असलेल्या ओपन वेब गर्डरच्या फॅब्रिकेशनचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. गर्डर निर्मितीचा हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ते साइटवर नेऊन लॉन्चिंगची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रकल्पासाठी मार्च २०२७ पर्यंत उड्डाणपूल पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. गर्डर लॉन्चिंगनंतर उर्वरित सिव्हिल व संबंधित कामे पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी कार्यान्वित केला जाईल.
रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फायदा
रेल्वे उड्डाणपुलामुळे रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहनधारकांना अखंडित मार्ग मिळेल, ज्यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होतील. बुरहानपूरसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानक व यार्ड (Railway station and yard) परिसरात हा प्रकल्प स्थानिक वाहतूक व्यवस्थेसोबतच भविष्यातील रेल्वे क्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून प्रकल्पाची सर्व कामे निर्धारित वेळापत्रकानुसार वेगाने पूर्ण केली जात आहेत.
Nashik : राज्यातील गरजू नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे यासाठी गरजू नागरिकांना सरकारकडून शिधापत्रिका (Ration card) दिली जाते ज्याद्वारे सरकारी स्वस्त ...
प्रकल्पाचे टप्पे व सद्यःस्थिती :
ओपन वेब गर्डर फॅब्रिकेशन : सुमारे ९० टक्के पूर्ण
गर्डर वाहतूक : ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रस्तावित
गर्डर लॉन्चिंग : जानेवारी २०२७ पर्यंत प्रस्तावित
उड्डाणपुलाचे कमिशनिंग मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य
ओपन वेब गर्डरचे फॅब्रिकेशन ९० टक्के पूर्ण






