Wednesday, August 19, 2026

Nashik : मालेगावमध्ये भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Nashik : मालेगावमध्ये भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Nashik Bus Accident : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बुधवारी  भीषण अपघात घडला आहे. बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहेत.

मालेगावमधील चाळीसगाव रोडवरील दहिवळ शिवारात बस-ट्रकची भीषण धडक झाली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दहाव्या मैलाजवळ भीषण अपघात

दरम्यान, नाशिक– मुंबई -आग्रा महामार्गावर नाशिक ते ओझर दरम्यान दहाव्या मैलाजवळ मंगळवारी सकाळी दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. दुचाकी घसरल्याने पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालमोटारीखाली चालक सापडला. या प्रकरणी आडगांव पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.धनंजय कुमार ठाकूर (रा. ओझर टाऊनशीप) हे दहाव्या मैलाजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) कामगार होते. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास कामावर जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. महामार्गावरील अर्धवट आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालक तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >