Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने थोडेफार चढउतार सुरु होते. मात्र, बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंचे दर अचानक उसळल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. अलीकडील दर घसरणीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. (Jalgaon Gold Rate)
बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या प्रसिद्ध हॉस्पिटल साखळीच्या शेअर्सचे ...
एकाच दिवसात सोनं-चांदीच्या दराचा भडका
बुधवारी सकाळच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत सोन्याचा भाव ०.८५ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,१८८.१० डॉलर इतका नोंदवला गेला. चांदीच्या किमतींमध्येही मजबूत तेजी दिसून आली. कॉमेक्सवर चांदीचा भाव १.३४ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ६१.०५५ डॉलर इतका नोंदवला गेला. सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाली, तर चांदीने सर्वांनाच धक्का देत एकाच दिवसात तब्बल ९ हजार रुपयांची ऐतिहासिक झेप घेतली. या अचानक झालेल्या अनपेक्षित दरवाढीमुळे ऐन सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Jalgaon Gold Rate)
सोन्याचे आजचे दर ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) मंगळवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,५९९ रुपयांपर्यंत पोहचले होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी दरवाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,०४१ रुपयांपर्यंत वधारले. (Jalgaon Gold Rate)
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या विधेयकातील तरतुदींमुळे केंद्र ...
चांदीचे आजचे दर ?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) मंगळवारी कोणतीच घडामोड न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह २,२८,६६० रुपयांपर्यंत स्थिर होते. बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दरवाढ नोंदविण्यात आल्याने चांदी जीएसटीसह प्रति १० ग्रॅम २,३२,७८० रुपयांपर्यंत वधारली. (Jalgaon Silver Rate)
सोनं-चांदीचे दर का वाढले?
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडींसह डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार, मध्यवर्ती बँकांची धोरणे आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना आधार मिळत आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीनुसार सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातही आंतरराष्ट्रीय दरांचा परिणाम दिसून येत असून, सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.






