मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येतं आणि मानसिक तणावही कमी होतो. जर तुम्हीही सोलो ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर भारतातील ही काही सुरक्षित, सुंदर आणि बजेट-फ्रेंडली ठिकाणं तुमच्या यादीत नक्की असावीत.
१. ऋषिकेश, उत्तराखंड : साहसी पर्यटन आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर ऋषिकेश हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, योग आणि गंगा आरतीचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.
३. पाँडिचेरी : फ्रेंच संस्कृतीची झलक, स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत वातावरणामुळे पाँडिचेरी सोलो ट्रॅव्हलर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. सायकलवर शहर फिरण्याचा अनुभव खास ठरतो.
४. उदयपूर, राजस्थान : 'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखले जाणारे उदयपूर राजवाडे, तलाव आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे पर्यटकांना भुरळ घालते. एकट्याने फिरण्यासाठी हे शहर सुरक्षित आणि आकर्षक आहे.
५. गोवा : गोवा म्हणजे फक्त मित्रांसोबतची ट्रिप नाही. सोलो ट्रॅव्हलर्ससाठीही येथे अनेक हॉस्टेल्स, सुंदर बीच, कॅफे आणि वॉटर स्पोर्ट्सची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. (Solo Trip)
६. हम्पी, कर्नाटक : इतिहास, प्राचीन वास्तू आणि शांत वातावरण अनुभवायचे असेल तर हम्पी हा उत्तम पर्याय आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या ठिकाणाला देश-विदेशातील पर्यटक भेट देतात.
७. मेघालय : धबधबे, हिरवीगार दरी, लिव्हिंग रूट ब्रिज आणि स्वच्छ निसर्ग यामुळे मेघालय सोलो ट्रिपसाठी एक उत्कृष्ट डेस्टिनेशन ठरते.
अनारकली (Anarkali) कुर्ती https://prahaar.in/2026/07/27/eating-honey-daily-offers-these-amazing-health-benefits-find-out-what-the-experts-say/ पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी नेहमीच बेस्ट पर्याय. ...
सोलो ट्रिपला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :
- प्रवासाचे नियोजन आधीच करा. - कुटुंबीयांना आपल्या लोकेशनची माहिती द्या. - आवश्यक कागदपत्रे आणि ओळखपत्र सोबत ठेवा. - रात्री अपरिचित ठिकाणी एकटे जाणे टाळा. - मोबाईल पूर्ण चार्ज ठेवा आणि पॉवर बँक सोबत ठेवा. (Solo Trip)






