Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शुक्रवारी (दि. २४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 15, 394 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकर्यांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा जपानमधील आयाची नागोया येथे खेळली जाणार ...
गंगापूर धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून सर्वाधिक 94 हजार 497 क्युसेक पाण्याचा प्रवाह पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील गावांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे नाव काढताच डोळ्यांसमोर काय येते? तासन् ...
संध्याकाळी ६ वाजता धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)
गंगापूर - 15, 394
गौतमी गोदावरी - 1000
दारणा - 16, 958
वालदेवी - 2832
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – 94, 497
भाम – 6,138
चणकापूर – 1,869
हरणबारी – 3689






