Nashik : नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने पाच वर्षापासून ‘माहेरघर’ उपक्रम राबविण्यात येत आहे. आदिवासीबहुल भागातील गरोदर मातांसाठी 'माहेरघर' हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. सद्यस्थितीत पेठ तसेच त्र्यंबकेश्वर येथील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यात सर्व ठिकाणी हा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावर देखील पाऊस सुरु आहे. अशातच आदिवासीबहुल तसेच डोंगराळ भागात पडणाऱ्या पावसामुळे गावांचा संपर्क तुटतो. अशा स्थितीत गरोदर मातांची प्रसूती सुखरूप होण्यासाठी माहेर घर ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) चायना ओपन २०२६ (China Open 2026) मधील प्रवास अंतिम १६ च्या फेरीतच संपुष्टात आला आहे. चीनच्या चौथ्या ...
‘माहेरघर’ उपक्रमाची वैशिष्ट्ये काय ?
आरोग्य विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा विचार केला असता ज्या महिलांची प्रसूती जवळ आली आहे, अशा महिलांची यादी आरोग्य विभागाच्या वतीने तयार करुन पावसामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत त्यांना नियोजित वेळेपेक्षा आधीच दवाखान्यात दाखल करण्यात येते. त्यानंतर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलेची तपासणी करुन प्रसूतीमध्ये काही जोखीम आहे का, हे बघून प्रसूती काळातील जोखीम टाळण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. या माध्यमातून माता तसेच बाल मृत्युवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अनेक गरोदर महिलांना या उपक्रमामुळे मोठा फायदा होत आहे. सोबतच अचानक होणारी धावपळ देखील टळत आहे.
बंगळुरू : बंगळुरूमधील चर्चेत असलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या (Triple Murder Case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ आणि पेठ तालुक्यात जोगमोडी या प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर हा उपक्रम प्रत्यक्षात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी माहिती दिली.






