- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
बुलढाणा\गिरडा : गिरडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या आणि सलग दोन वेळा पाळीव जनावरांवर हल्ले करून मोठे नुकसान करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्याने गेल्या अनेक दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली जीवन जगणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गिरडा येथील शेतकरी रमेश बबनराव सोनुने यांच्या गोठ्यात ५ जुलै रोजी बिबट्याने घुसून तब्बल सहा बकऱ्यांचा फडशा पाडला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही घटना ताजी असतानाच, १४ जुलै रोजी बिबट्याने पुन्हा हल्ला चढवत पाच शेळ्या आणि एका वासराला ठार केले. अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत ११ बकऱ्या आणि एका वासराचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढली होती.
Nashik : नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले दुथडी भरुन वाहत असून काही ठिकाणी ...
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे धोकादायक बनले होते. अनेकांनी सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळले होते. लहान मुलांना एकटे बाहेर न पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी स्वतः गिरडा येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरात सतत गस्त घालत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
वनविभागाने रणनीतीपूर्वक लावलेल्या पिंजऱ्यात अखेर हा बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी वनविभागाच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे कौतुक करत अधिकाऱ्यांचे आभार मानले.
Nashik : नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने पाच वर्षापासून ‘माहेरघर’ उपक्रम राबविण्यात येत आहे. आदिवासीबहुल भागातील गरोदर मातांसाठी 'माहेरघर' हा उपक्रम ...
वनविभागाने नागरिकांना अद्यापही जंगलालगतच्या भागात सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, वन्यप्राण्यांचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नियमानुसार त्याला योग्य अधिवासात सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
View this post on Instagram






