Saturday, July 18, 2026

Dhule : साक्री तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; निवृत्त बँक अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Dhule : साक्री तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; निवृत्त बँक अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Dhule Crime : साक्री तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील घोडदे येथे एका सेवानिवृत्त बैंक मॅनेजरच्या घरावर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तीन अनोळखी दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असून दांपत्याला लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली असून सोन्याची पोत लांबवली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Dhule Crime News)

नेमकं काय घडलं ?

ही संपूर्ण घटना साक्री तालुक्यातील घोडदे येथे घडली असून प्रकाश बाबुलाल क्षीरसागर (६२) असे या सेवानिवृत्त बँक मॅनेजर नाव आहे. प्रकाश क्षीरसागर हे आपल्या कुटुंबासह घोडदे येथे राहतात. रात्री २.३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या मागील सेफ्टी गेटची कडी उघडून आत प्रवेश केला . यावेळी एका दरोडेखोराने हातातील लोखंडी रॉडने प्रकाश क्षीरसागर यांच्या कंबर आणि पाठीच्या डाव्या बाजूला जबर मार दिला.तर दुसऱ्या दरोडेखोराने त्याच्याकडील कुऱ्हाडीने थेट क्षीरसागर यांच्या कपाळावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. (Dhule Crime News)

पोलिसांकडून तपास सुरु

पुढे, त्यानंतर कुऱ्हाड घेतलेल्या दरोडेखोराने प्रकाश श्रीरसागर यांची पत्नी हेमलता यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची भीती घातली. त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि घटनस्थाळावरून पसार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी प्रकाश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात तीन अज्ञात दरोडेखोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटेनमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले पोलिसांकडून पोलीस तपास सुरु आहे.

नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात

दरम्यान, नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे देवदर्शन आटोपून नाशिककडे परतीच्या प्रवासात असलेल्या भाविकांच्या कारचा धुळे जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातातील सर्व जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. देवदर्शनाहून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या या कुटुंबावर वाटेतच काळाने असा भयंकर घाला घातल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >