Saturday, July 18, 2026

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं अशी अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते, पण आर्थिक परिस्थितीमुळे मोठा अडथळा निर्माण होतो. आणि मोठ्या शाळेत शिक्षण घेण्याची इच्छा मागेच राहून जाते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून ‘ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देशातील अव्वल संस्थांमध्ये शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते.

सरकारची ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’ अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणारी ठरलेली आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योजनेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जवळपास संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जातो. संबंधित संस्थेची पूर्ण शैक्षणिक फी, वसतिगृहाचा खर्च आणि भोजनाचा खर्च शासनाकडून दिला जातो. याशिवाय पुस्तके आणि स्टेशनरीसाठी दरवर्षी १० हजार रुपयांची अतिरिक्त मदतही विद्यार्थ्यांना मिळते. तुम्हांला देखील या योजनेचा फायदा घ्य्याचा आहे तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, दरवर्षी राज्यातील केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड या योजनेसाठी केली जाते.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतो लाभ?

'राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याला IIT, IIM, NIT, IISER यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा आत असावे.

अर्ज कुठे करायचा ?

या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे अर्ज सादर करायचा असतो. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रवेशपत्र आणि फी संरचनेची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >