Saturday, July 18, 2026

10th and 12th Marksheet : घरी बसल्या अशी मिळवा तुमची दहावी आणि बारावीची ओरिजिनल मार्कशीट

10th and 12th Marksheet : घरी बसल्या अशी मिळवा तुमची दहावी आणि बारावीची ओरिजिनल मार्कशीट

- दहावी-बारावीची मार्कशीट हरवली ? एका मिनिटांत करा डाउनलोड

मुंबई : तुम्हाला माहितीये का ? तुमची दहावी किंवा बारावीची मूळ मार्कशीट (10th and 12th Marksheet) हरवली असेल किंवा ती जुनी होऊन खराब झाली असेल. तर मग आता अजिबात टेन्शन घेऊ नका! कारण तुम्ही घरी बसूनच, तुमच्या मोबाईलवरून तुमची ओरिजिनल मार्कशीट काही मिनिटांत डाऊनलोड करू शकता. अगदी थोडक्यात सांगते पण त्याआधी प्रहार न्यूजलाईनला फॉलो आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.

सर्वांत आधी, तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला 'Create New Account' असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे विचारलेली तुमची सर्व साधी माहिती भरा आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा. रजिस्ट्रेशन झाल्यावर लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वरती दोन पर्याय दिसतील - दहावी आणि बारावी. यापैकी तुम्हाला जी मार्कशीट (10th and 12th Marksheet) हवी आहे, तो पर्याय निवडा.

पुढच्या पेजवर तुम्हाला तुमच्या परीक्षेचं वर्ष, परीक्षेचा महिना आणि तुमचा अचूक सीट नंबर टाकायचा आहे. बस्स! खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट केल्यावर तुमच्यासमोर तुमची डिजिटल मार्कशीट येईल. ही मार्कशीट तुम्ही तिथेच असलेल्या बटणावरून PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता. आहे ना एकदम सोपी पद्धत ? मग आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा, ज्यांना याची खरंच गरज आहे! (10th and 12th Marksheet)

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >