मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स, वृत्तपत्र किंवा टीव्हीवरील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे स्पष्ट निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे प्रभारी रवी अनासपुरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्सव, स्वागत समारंभ किंवा जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Devendra Fadnavis)
नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय दिला आहे. 'Motherfker'** आणि 'Son of a Whe'** यांसारखे ...
सूचनांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई :
भाजपने स्पष्ट इशारा दिला आहे की, पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कोणीही होर्डिंग, बॅनर किंवा जाहिराती प्रसिद्ध केल्यास त्याची गंभीर शिस्तभंगाची दखल घेतली जाईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांवर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी पक्षाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. (Devendra Fadnavis)
ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा पठणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रवी ...
सामाजिक बांधिलकीला प्राधान्य :
पक्षाने कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान देऊन गरजू नागरिकांच्या मदतीसाठी हातभार लावावा, असा संदेश भाजपने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा जल्लोषाऐवजी सेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनकल्याण यांना प्राधान्य देण्याचा भाजपचा हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Devendra Fadnavis)





