अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार
मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत. नागरिकांना या दोन्ही बाबी शुद्ध व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून विश्लेषक प्रयोगशाळा कार्यरत आहे. दादर येथील ‘जी उत्तर’ कार्यालयातील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने तपासण्यात येतात. अत्यंत अल्प दरात तसेच अवघ्या २४ तासांत पाणी तपासणी अहवाल वापरकर्त्याच्या मोबाईल आणि ईमेलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा प्रयोगशाळेच्या माध्यमातून देण्यात येते. तरीही पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या विश्लेषक प्रयोगशाळेचा (Laboratory) नागरिक, व्यावसायिक आस्थापनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारितील महानगरपालिका विश्लेषक प्रयोगशाळा ही सुमारे १२३ वर्षे जुनी प्रयोगशाळा असून तेव्हापासून अविरतपणे मुंबईकरांच्या सेवेत आहे. वर्ष १९०३ रोजी सुरू झालेल्या प्रयोगशाळेत काळानुरूप अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. गत दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ७ लाखांहून अधिक पाणी आणि अन्नाचे नमुने या प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. महानगरपालिकेची अन्न आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी ही एकमेव प्रयोगशाळा दादर येथे कार्यरत आहे.
Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या विमानसेवेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ...
या प्रयोगशाळेत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ( municipal corporation) वितरित केल्या जाणाऱ्या पाण्याचे दैनंदिन नमुने, खाऊगल्ल्यातील फास्टफूड, बर्फाचे नमुने, बांधकामाला वापरले जाणारे पाणी, तसेच जलतरण तलावासाठी वापरले जाणारे पाणी आदींची नियमितपणे तपासणी आणि विश्लेषण केले जाते. त्यामुळे, संबंधित पाण्याची गुणवत्ता आणि शुद्धता जाणून घेऊन त्यावर वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करता येणे शक्य होते. नमुने तपासण्यासाठी या प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी अद्ययावत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. वर्षभरात सुमारे ४५ हजारांहून अधिक पाण्याचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात येतात. महत्वाचे म्हणजे, अवघ्या २४ तासांमध्ये पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल उपलब्ध होतो. आस्थापनांसाठी संकेतस्थळावर आणि नागरिकांना ईमेल व व्हॉट्सअॅपवर अहवाल उपलब्ध करून देण्यात येतो.
मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर नियमित सुरक्षा ...
पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर ...






