Malegaon : मालेगाव तालुक्यात अंधश्रद्धा आणि अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंगसे (Mungse) शिवारातील एका फार्महाऊसवर मध्यरात्री सुरू असलेल्या गुप्त अघोरी पूजेवर तालुका पोलिसांनी अचानक छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून जादूटोण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, मुख्य 'भगत' मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंगसे येथील एका व्यापाऱ्याच्या फार्महाऊसवर रात्रीच्या अंधारात काही जण गुप्त पूजा आणि जादूटोणा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री फार्महाऊसवरील सालदाराच्या घरावर धाड टाकली. पोलिसांनी घरात प्रवेश करताच अघोरी पूजेची मांडणी आणि त्याभोवती बसलेले काही जण दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहाची दफनविधीसाठी चक्क ...
लिंबू, काळे धान्य, काळा धागा जप्त
छाप्यामध्ये पोलिसांनी लिंबू, काळा धागा, काळे धान्य तसेच जादूटोणा आणि अघोरी पूजेसाठी वापरले जाणारे विविध साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात एकूण १० जणांचा समावेश असून त्यापैकी योगेश देवरे, रऊफ इब्राहिम शेख, अरुण इंगळे, सुखदेव मोरे, साहेबराव निकम, महादेव रायते आणि राजेंद्र लोले यांना अटक करण्यात आली आहे. एका महिलेसह आणखी एका संशयिताला नोटीस बजावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य 'भगत' अबिद महाराज हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
FIFA World Cup : सध्या जगभरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह सुरु आहे. याचाच गैरफायदा घेत ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्या आंतरराज्यीय बेटिंग रॅकेटचा(Interstate betting racket) नाशिक ...
'पैशांचा पाऊस' की गुप्तधनाचा हव्यास ?
ही अघोरी पूजा नेमकी कोणत्या उद्देशाने सुरू होती, याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र प्राथमिक तपासात पैशांचा पाऊस पाडणे, गुप्तधन मिळवणे किंवा तत्सम अंधश्रद्धेतून हा प्रकार घडत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हेमंत देवरे करत आहेत.






