Nashik : नाशिकमध्ये एक मोठी घटना घडली आहे. नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) प्लास्टिक आणि खोके बनविणाऱ्या एका नामांकित कंपनीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी घडली नसल्याची माहिती आहे.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर प्रहार मुंबई : मुंबईत अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका ...
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) प्लास्टिक आणि खोके बनविणाऱ्या एका नामांकित कंपनीला अचानक भीषण आग लागली. ही आग (Fire) नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या आगीत मात्र मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार, सुरक्षित आणि नियमानुसार पूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिकेकडून ...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की परिसरात धुराचे प्रचंड लोट उसळले होते. आगीची तीव्रता अधिक असल्याने तातडीने सातपूर अग्निशमन दलाच्या (Satpur Fire Brigade) जवानांना पाचारण करण्यात आले. यानंतर सुमारे एका तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.






