Shrigonda Police Bribery Case : पोलिसांना रक्षक समजले जाते, पण हेच पोलीस भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी जायचं कोणाकडे असा प्रश्न श्रीगोंदाकडे घडलेल्या एका घटनेनं उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं ?
श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील (Srigonda Police Station) तीन कर्मचार्यांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि त्याची माहिती ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी तक्रारदारांकडून १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती, दरम्यान, तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील तीन कर्मचार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून एक धकाकदायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्पातील भरती प्रक्रियेत मोठा ...
या पोलिसांवर गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणात पोलिस अंमलदार नितीन अशोक गाडगे (वय 44), राजेश रावसाहेब जाधव (वय 38), दादाराम शिवराम म्हस्के (वय 56) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत मोरोक्कोने शानदार कामगिरी करत स्कॉटलंडचा १-० असा पराभव केला. या विजयासह मोरोक्कोने स्पर्धेतील पहिला विजय मिळवत बाद ...
नेमकं प्रकरण काय ?
तक्रारदाराच्या भावाचा १ जून रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर दौंड (Daund) येथील पाटील हॉस्पिटलमध्ये (Patil Hospital) उपचार सुरू होते. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाचा जबाब नोंदवून हे प्रकरण श्रीगोंदा पोलिस ठाण्याकडे वर्ग केले होते. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नितीन गाडगे यांच्याकडे होता. अपघाताच्या ठिकाणाची माहिती आयआरएडी ॲप्लिकेशनमध्ये भरण्यासाठी आणि रीतसर गुन्हा दाखल करण्यासाठी नितीन गाडगे व मदतनीस राजेश जाधव यांनी तक्रारदाराकडे १० हजारांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार १६ ते १८ जून दरम्यान लाचलुचपत पथकाने पडताळणी सापळा लावला असता नितीन गाडगे व राजेश जाधव यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती सात हजार देण्याचे ठरले. या दरम्यान शासकीय वाहनावरील चालक दादाराम म्हस्के याने मध्यस्थी करीत नितीन गाडगे यांनी मागितलेली सात हजारांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. १८ जून रोजी म्हस्के याला सात हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.






