मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. सणासुदीच्या काळात, लग्नसराईत किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र, केवळ आकर्षक ऑफर किंवा कमी-जास्त दर पाहून सोने खरेदी करणे योग्य ठरत नाही. काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी खालील चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे. (Gold Buying Tips)
1. हॉलमार्क न तपासता सोनं खरेदी करू नका
BIS Hallmark असलेले दागिनेच खरेदी करा. त्यामुळे शुद्धतेची खात्री मिळते.
2. फक्त सोन्याच्या दरावर लक्ष देऊ नका
मेकिंग चार्जेस, GST आणि इतर शुल्क किती आहेत, हेही तपासा. अंतिम बिल अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते.
3. बिल न घेण्याची चूक करू नका
खरेदीचे अधिकृत बिल भविष्यात एक्स्चेंज, विक्री किंवा तक्रारीसाठी महत्त्वाचे ठरते.
4. 22K आणि 24K मधील फरक समजून घ्या
24 कॅरेट सोनं अधिक शुद्ध असतं, तर दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याला अधिक पसंती दिली जाते.
5. वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे किंमतींची तुलना करा
एकाच डिझाइनसाठी मेकिंग चार्जेस आणि ऑफर्स वेगवेगळ्या असू शकतात.
6. फक्त ऑफर पाहून खरेदी करू नका
'Zero Making Charges' किंवा 'Flat Discount' अशा ऑफर्सची अटी-शर्ती आधी वाचा.
7. गरजेनुसार योग्य पर्याय निवडा
गुंतवणुकीसाठी गोल्ड कॉईन, गोल्ड बार किंवा डिजिटल गोल्ड योग्य ठरू शकते, तर वापरासाठी दागिने हा पर्याय निवडा.