नाशिक : गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, कत्तल आणि मांसविक्रीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) हद्दपारीची कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर ...
तिघांवर हद्दपारीची कारवाई
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आढावा घेऊन संबंधित विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गुन्हेगारांविरुद्ध दाखल गुन्हे, त्यांचे वास्तव्य, हालचाली व वर्तन यांची तपासणी करून प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यानुसार नवाज रशीद सय्यद उर्फ मुन्ना (वय ५२, रा. बागवानपुरा, नाशिक रोड), जमील रशीद कुरेशी (वय ४०, रा. नाईकवाडीपुरा, जुने नाशिक) आणि अंजुम बिस्मिल्ला कुरेशी (वय ५०, रा. मुंबई नाका, नाशिक) या तिघांवर कारवाई करण्यात आली.
या तिघांविरुद्ध गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, कत्तल आणि मांसविक्रीचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी प्राण्यांच्या जीवितास तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय विरोध करणाऱ्यांना मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणे असे प्रकारही त्यांनी केल्याचे आढळून आले.
Jalgaon Crime : चाळीसगाव बसस्थानक (Chalisgaon Bus Station) परिसरात क्षुल्लक कारणातून एका तरुणाचा विटांनी ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दुकान ...
या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी (अंबड विभाग) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम (नाशिक रोड विभाग) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(अ) व (ब) अन्वये तिन्ही गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या आणि जनजीवन विस्कळीत करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात यापुढेही हद्दपारी व एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेसारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन गुन्हेगारीविषयी माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी केले आहे.





