मंत्री नितेश राणेंचा टोला; 'महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांना हेल्मेट पाठवणार'
मुंबई : "उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, म्हणूनच ६ खासदारांनी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. आदित्य ठाकरे (Aditya Tackarey) हे महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी आहेत, त्यांना आधी आवरले असते तर आज उबाठावर ही नामुष्की आली नसती," असा टोला भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी लगावला. 'ऑपरेशन टायगर'बाबत कणकवली येथे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ग्रामीण ...
मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले, "ऑपरेशन टायगरबाबत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी आता काहीही ओरड केली तरी त्याला अर्थ नाही. पण या बंडाला जबाबदार कोण याचा विचार उबाठाने करावा. जसे तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आहे, तसा आदित्य हा उबाठाचा अभिषेक बॅनर्जी आहे. आदित्यला कोणी प्रश्न का विचारत नाही की, तू पक्षात असताना तुझे खासदार तुला सोडून का गेले? जशी अभिषेक बॅनर्जींवर पश्चिम बंगालमध्ये हेल्मेट घालून फिरण्याची वेळ आली, तसे एक हेल्मेट मी आदित्य ठाकरेंना पाठवणार आहे. महाराष्ट्रामध्ये फिरताना संतापलेल्या जनतेकडून चुकून अंडी आणि चपला आल्या, तर संरक्षणासाठी हे हेल्मेट हवे. पण 'पेंग्विन' हेल्मेट घालून कसा दिसेल, हे एक वेगळेच संशोधन आहे", अशी कोपरखळीही त्यांनी काढली
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत ...
नितेश राणे यांनी या वेळी उद्धव ठाकरेंवर काँग्रेसचरणी लीन झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, म्हणून ६ खासदारांनी एकनाथ शिंदे (Ek Nath Shinde ) यांचे नेतृत्व स्वीकारले. 'माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, नाहीतर दुकान बंद करेन,' असे ठणकावून सांगणारे आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे पाप मातोश्रीने केले. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. आदित्य ठाकरेंना काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा प्रस्ताव आला होता. जर बाळासाहेबांचे विचारच यांना बुडवायचे असतील, तर स्वाभिमानी खासदार यांच्यासोबत कशाला राहतील? तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार असाल तर आता नेहरू, गांधींचाच गोडवा गात बसा," असा हल्लाबोल त्यांनी केला.
Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोने खरेदी करून इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...
सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर!
बंडखोर खासदारांना 'वाय+'(Y plus Security) सुरक्षा पुरवल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही राणे यांनी खरपूस समाचार घेतला. "गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस लावले म्हणतात, मग उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर स्वतःचे सरकारी संरक्षण सोडावे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसले आहेत. हिंदुत्वावर तयार झालेल्या शिवसैनिकांनी जेव्हा पाहिले की पक्षनेतृत्व काँग्रेसच्या विचारांना, जिहादला आणि हिंदुत्वविरोधी भूमिकेला स्वीकारत आहे, तेव्हा त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत ...





