माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम; १२ डिसेंबरआधी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठा पक्षाला खिंडार पाडत 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) यशस्वी केल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एका भूकंपाचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाबाबत खळबळजनक दावा केला आहे. "आम्हाला कोणतेही ऑपरेशन राबवण्याची गरज नाही, पण शरद पवार गटाचे (तुतारी) कमीत कमी ५ विद्यमान खासदार निधी आणि विकासकामांसाठी स्वतःहून घड्याळाची साथ देण्यास इच्छुक आहेत," असे वक्तव्य आत्राम यांनी केले आहे.
मंत्री नितेश राणेंचा टोला; 'महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांना हेल्मेट पाठवणार' मुंबई : "उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, म्हणूनच ६ खासदारांनी ...
श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) आगामी 'ईठा' (Etha) चित्रपट (Movie) सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर (Teaser) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून ...
काँग्रेसचेही काही खासदार संपर्कात
आत्राम म्हणाले, "उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वावर लोकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास आणखी वाढला आहे. काही माजी खासदारांसह विद्यमान खासदारही आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. केवळ तुतारीच नव्हे, तर काँग्रेसचेही काही खासदार आमच्या संपर्कात असून ते पक्षात येण्यास इच्छुक आहेत. सर्वांना आपल्या भागात मोठ्या प्रमाणावर निधी आणि विकासकामे हवी आहेत. आपण निवडून आलो आहोत तर लोकांची कामे झाली पाहिजेत, याच अपेक्षेने हे लोक आमच्याकडे येतील", असे आत्राम यांनी नमूद केले.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यापेक्षा संजय राऊत ...






