Nashik : नाशिक विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण राज्यात गाजत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) या संदर्भात गुन्हा दाखल असून या प्रकरणाने विभागातील ५०० हून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अडचणीत आले आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे.
या गुन्ह्यातील संशयित व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी नितीन उपासनीच्या (Nitin Upasani) जामिनाबाबत उद्या शुक्रवारी (दि. १९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून संशयितांनी सुनियोजित कट रचत फसवणूक केल्याचे निरीक्षण नाशिकरोड सत्र न्यायालयाने (Nashik Road Sessions Court) पोलीस तपासाच्या आधारे नोंदविले आहे.
Nashik Crime News : नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन येथे मंगळवारी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळलेल्या महिलेच्या ...
'शालार्थ आयडी घोटाळा' हा सुनियोजित कट
नाशिकरोड पोलीस ठाण्यात मार्च २०२६ मध्ये दाखल गुन्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छावचा जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे. बच्छाव याचा जामीन अर्ज फेटाळताना पोलिसांच्या तपासाच्या आधारे हा गुन्हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा नसून, मुलांच्या शिक्षणासाठी असणाऱ्या सार्वजनिक पैशांची पद्धतशीर केलेली लूट आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांचे हक्क हिरावले गेले असून, शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. हा एक सुनियोजित कट असलेला पांढरपेशा गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
इस्लामाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर बंगालच्या खाडीतून जवळपास पूर्णपणे माघार घेतलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा या ...
अशोक गिरी नियंत्रण कक्षात
मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्यात १२६ संशयित आहेत. त्यापैकी चव्हाण अद्यापही फरार असून, या गुन्ह्यात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहसंशयित केले आहे. गतवर्षी निलंबित झालेल्या गिरी यांची पोलीस आयुक्तालयाने नियंत्रण कक्षात नेमणूक केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि केली पाहणी ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील आर.सी. पाटील पुलाजवळ (R.C. Patil Bridge)गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ...
संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी
नाशिक विभागातील खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील तब्बल ८९२ कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी शासकीय नोंदीतील जावक क्रमांकांशी जुळत नसल्याचे चौकशीत उघड झाले होते. या प्रकारामुळे शालार्थ प्रणालीतील पारदर्शकता, मान्यता प्रक्रिया आणि शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. संबंधित कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याअनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर चौकशी काही महिन्यांपासून सुरू आहे.
दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित राज्य शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष संशयित नितीन उपासनी हा कारागृहात असून, त्याच्याविरुद्ध नाशिक, मालेगावसह नवी मुंबई येथील वाशी पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत. तर, तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह इतर संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. याबाबत सन २०२६ मध्ये दाखल गुन्ह्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 'एसआयटी' स्थापन केली असून, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करत आहेत.





