Nashik : नाशिकच्या क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. नाशिकचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रमेश संवत्सरकर (Ramesh Samvatsarkar) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
क्रिकेट क्षेत्रात रमेश संवत्सरकर हे ‘जॉनी सर’ या नावाने अधिक परिचित होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी क्रिकेट प्रशिक्षण देत अनेक खेळाडूंना घडविण्याचे काम केले. त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाची दखल घेत नाशिक क्रिकेट असोसिएशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुंबई : आयपीएल २०२६ हंगाम संपून एक महिन्यापेक्षा कमी काळ लोटला आहे.आता,बीसीसीआयने पुढील हंगामाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२७ चा ...
‘जॉनी सर’ हे नाव कसे पडले ?
रमेश संवत्सरकर यांना ‘जॉनी’ हे टोपणनाव पडण्यामागे एक रंजक किस्सा आहे. त्या काळात अभिनेते देव आनंद यांचा ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट प्रचंड गाजत होता. मैदानावर विकेट मिळाली किंवा झेल पकडला की रमेश संवत्सरकर आनंदाने टोपी हवेत फेकत ‘जॉनी मेरा नाम’ असे उद्गार काढत असत. त्यानंतर सहकारी खेळाडूंनी त्यांना ‘जॉनी’ म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे तेच त्यांची कायमची ओळख बनली.
मेक्सिको सिटी — २०२२ च्या कतार विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर, कोलंबिया संघाने पुन्हा एकदा फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर दिमाखात पुनरागमन केले आहे. ...
महाराष्ट्र अजिंक्यपदाच्या विजयात मोलाचा वाटा
नाशिक क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षणांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेतील विजयात रमेश संवत्सरकर यांचा मोठा वाटा होता. सांगलीविरुद्धच्या निर्णायक सामन्यात नाशिकचा संघ अडचणीत सापडला असताना त्यांनी कमरुद्दीन यांच्यासोबत शतकी भागीदारी रचली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नाशिकची अवस्था 3 बाद 23 अशी बिकट झाली होती. मात्र जॉनी संवत्सरकर यांनी संयमी आणि जिद्दी फलंदाजी करत तब्बल पाच तास किल्ला लढवला. त्यांनी नाबाद 102 धावांची खेळी साकारत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. या खेळीमुळे नाशिकने प्रथमच महाराष्ट्र अजिंक्यपदावर नाव कोरले. स्वतः रमेश संवत्सरकर यांनीही अनेकदा ही खेळी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वांत मौल्यवान खेळी असल्याचे सांगितले होते.
त्यांच्या निधनाने नाशिकच्या क्रिकेट क्षेत्रातील एका समर्पित खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकाचा अंत झाला असून क्रिकेटप्रेमींकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.




