Ahilyanagar Fake Milk Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड (Jamkhed) तालुक्यातील फक्राबाद येथे उघडकीस आलेल्या बहुचर्चित बनावट दूध प्रकरणाच्या तपासाला नव्याने वेग आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका रात्रीत सात संशयित आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठीत; अटी शिथिल होणार असल्याने लाखो शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : महायुती सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक ...
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये हरिदास एकनाथ गोपाळघरे (ता. जामखेड), सद्दाम कमरूद्दीन शेख, चंद्रकांत अण्णा बर्डे (ता. राहुरी), महेश तुकाराम मोकाटे (अहिल्यानगर), लक्ष्मण पोपट करंजुले (ता. पारनेर), किशोर काशिनाथ पुंड (ता. श्रीरामपूर) आणि सर्जेराव काशिनाथ म्हसे (ता. राहुरी) यांचा समावेश आहे.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, १९ आणि २० जून रोजी ते कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या ...
बनावट दूध निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त
पोलिस तपासात या संशयितांनी बनावट दूध निर्मितीसाठी लागणारी रसायने, पावडर आणि अन्य साहित्य पुरवल्याचे समोर आले आहे. काही आरोपी कृत्रिम दूध तयार करून विक्री करत होते, तर काही जण संकलन व वितरणाच्या कामात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने फक्राबाद येथे संयुक्त कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला होता. छाप्यात पॅराफिन ऑईल, विविध रसायने आणि दूध फ्लेवर पावडरच्या साहाय्याने मानवी आरोग्यास घातक असे कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे आढळून आले होते.
Crime News :श्रीगोंद्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत अवघ्या17 वर्षीय मैत्रिणीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लिव्ह ...
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान 41 संशयितांची नावे निष्पन्न झाली असून पहिल्या टप्प्यात अटक केलेल्या सात आरोपींविरुद्ध सुमारे 850 पानी दोषारोपपत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चौघांना जामीन मिळाला असून तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या 14 वर पोहोचली आहे. अद्याप 27 संशयित फरार असून त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी अटकसत्र सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nashik : नाशिकच्या क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. नाशिकचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रमेश संवत्सरकर (Ramesh Samvatsarkar) यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 86 ...
पूर्वीच्या तपासाच्या गतीवर प्रश्न
मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा तपास चार महिन्यांपर्यंत संथ गतीने सुरू असल्याची चर्चा आता पुन्हा रंगू लागली आहे. अनेक संशयितांची नावे समोर येऊनही कारवाई का झाली नाही, याबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, विद्यमान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातल्याचे बोलले जात असून, तपासाला मिळालेल्या नव्या गतीमुळे बनावट दूध रॅकेटशी संबंधित व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच, पूर्वीच्या तपासातील विलंबाची चौकशी होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.






