Crime News :श्रीगोंद्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत अवघ्या17 वर्षीय मैत्रिणीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची हत्या तिच्याच प्रियकराने केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. त्यानंतर मुलाने वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन मृतदेह जाळला. याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सर्वानाच हादरा बसला आहे. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून सासरी गेलेल्या २२ वर्षीय विवाहितेने ...
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सुखदेव ओव्हाळ आणि मृत अल्पवयीन तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 15 जून रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या शुभमने लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने तरुणीच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
जंगलात नेऊन मृतदेह जाळला
खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह गादीत गुंडाळून लपवून ठेवला आणि केडगाव येथे जाऊन घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुभम आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी मृतदेह दुचाकीवरून वडाळी रस्त्यालगतच्या जंगलात नेला. तेथे लाकूडफाटा गोळा करून मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्यात आले. मृतदेह पूर्णपणे जळेपर्यंत दोघे घटनास्थळी थांबून होते आणि पहाटे घरी परतले.
उत्तराखंड : उत्तराखंडमधील निसर्गरम्य आणि पवित्र 'छोटा चार धाम' पैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये सध्या यात्रेची लगबग सुरू आहे. भगवान शंकराच्या ...
दरम्यान, शुभमने हा प्रकार आपल्या एका मित्राला सांगितला होता. सुरुवातीला मित्राचा विश्वास बसला नाही. मात्र आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे खुनाचा पुरावा दाखवल्यानंतर मित्राने नगर येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुभम आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
धक्कादायक म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीही संबंधित तरुणीने शुभमविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. वेळेत कारवाई झाली असती तर आपल्या मुलीचा जीव वाचला असता, अशी हळहळ तिने व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे करत आहेत.






