MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळल्यानंतर, सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांना आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील प्रसिद्ध फ्रँचायझी 'मुंबई इंडियन्स' (MI) मधूनही सूर्यकुमार यादव बाहेर पडण्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत.
वॉशिंग्टन : फिफा विश्वचषक २०२६ च्या (FIFA World Cup 2026 Firing) सुरुवातीला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमेरिकेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने फुटबॉलविश्वात चिंता ...
इन्स्टाग्रामवरील हालचालींनी वाढवल्या शंका
सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर उचललेलं एक पाऊल या चर्चांना पुष्टी देणारं ठरत आहे. सूर्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून मुंबई इंडियन्स या संघाला अनफॉलो केलं आहे. एवढंच नाही, तर त्याच्या प्रोफाईलवरून मुंबई इंडियन्सच्या जर्सीमधील सर्व फोटोही गायब झाले आहेत. या डिजिटल हालचालींनंतर, सूर्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्याची पत्नी देविशा शेट्टी अजूनही मुंबई इंडियन्सला फॉलो करत आहे.
न्यू चंदीगड:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः युवा फिरकीपटू मानव सुथारने ...
आयपीएल 2026 मधील निराशाजनक कामगिरी
सूर्यकुमार यादवसाठी आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला. या हंगामात १३ डावांत त्याने अवघ्या २७० धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी २०.७६ इतकी कमी होती. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीत त्याच्या फॉर्मचाही मोठा वाटा असल्याने, फ्रँचायझी आता आगामी 'मेगा लिलावा'पूर्वी (IPL 2027) संघात मोठे बदल करण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे.
जर्मनी : जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने (Alexander Zverev) फ्रेंच ओपन २०२६ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम ...
भविष्यात कोणता संघ?
सूर्यकुमार यादव २०१८ पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. जर तो खरोखरच मुंबईची साथ सोडत असेल, तर तो त्याच्या जुन्या 'कोलकाता नाईट रायडर्स' (KKR) संघात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सारखे संघही एका अनुभवी भारतीय फलंदाजाच्या शोधात असल्याने सूर्या त्यांच्यासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
बीसीसीआयने नुकतेच स्पष्ट केले आहे की, नवीन टी-20 सायकलच्या दृष्टिकोनातून आणि फॉर्मचा विचार करता, भारतीय संघात बदलांची गरज होती. आता मुंबई इंडियन्सच्या बाबतीत फ्रँचायझीकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






