- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) Global Warming गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी मुंबई तील विहिरी, तलाव व झरे यांसारख्या पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप नगरसेवक व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे (Pratik Karpe) यांनी महापालिकेकडे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, पालघर आणि ...
वाढते शहरीकरण आणि भूजल पातळीतील घट यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सॅटेलाईट मॅपिंग च्या साहाय्याने जलस्रोतांचे सर्वेक्षण करून अचूक जीपीएस को-ऑर्डिनेट्स निश्चित केले जावेत, जीआयएस आधारित 'डिजिटल वॉटर मॅप' तयार करून सर्व विहिरी व तलावांची माहिती एका व्यासपीठावर आणावी आणि आयओटी सेन्सर्सद्वारे पाण्याच्या पातळीवर व गुणवत्तेवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी 'स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग डॅशबोर्ड' विकसित केला जावा, असा प्रस्ताव त्यांनी (Pratik Karpe) मांडला आहे. (Global Warming)
पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात पुण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, ...
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बिगर-पिण्याच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर वाढेल, भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल आणि भविष्यातील Global Warming ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात स्थानिक पातळीवर पाण्याचा साठा तात्काळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत नगरसेवक प्रतीक कर्पे यांनी महापालिका आयुक्तांनी यावर त्वरित धोरण आखून अहवाल सादर करण्यात यावी अशी विनंती त्यांनी (Pratik Karpe) केली.





