Nashik TCS Case : नाशिकच्या बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणात दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ‘टीसीएस’ च्या नाशिक कार्यालयातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग (Massive Fire) लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १० ...
३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल
नाशिक पोलिसांनी TCS प्रकरणात दाखल एकूण ९ गुन्ह्यांपैकी पहिल्या गुन्ह्यात सुमारे ३,५०० पानांचे पहिले आरोपपत्र (charge sheet) न्यायालयात दाखल केले आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Devlali Camp Police Station) दाखल झालेल्या या पहिल्या गुन्ह्यात बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपपत्रातील माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानचा (Nida Khan) अटकपूर्व जामीन नाशिक न्यायालयाने (Nashik Court) फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. यावेळेस एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल (Mateen Patel) यांनी निदा खानला पोलिसांपासून लपवण्यासाठी आश्रय दिल्याचे समोर आले होते.
“इम्तियाज जलील यांना विचारावं लागेल”
निदा शोधासाठी निघालेल्या गुन्हे शाखेने (Crime Branch) मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे चौकशीसाठी बोलावले आणि निदा खान कुठे आहे, असे विचारले; त्यावेळेस पटेल यांनी वारंवार एकच उत्तर दिले. ते म्हणजे “इम्तियाज जलील यांना विचारावं लागेल”. कसून चौकशी केल्यानंतर अखेर मतीन पटेल (Mateen Patel) यांनी पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव-कौसर सिडको भागातील त्या जागेचा पत्ता दिला, जिथे निदा आणि तिचे कुटुंबीय लपले होते. याठिकाणी पोलिसांनी तात्काळ छापा टाकून निदा खान, तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांना ताब्यात घेतले.
नाशिक : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात कपालेश्वर मंदिर परिसरातील 'बिवलकर वाडा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या वाड्याची भिंत कोसळली, तसेच छताचे ...
पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी निदा खानच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं नाकारलेलं नाही. २१ एप्रिल रोजी त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, आपण पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. तसेच प्रशासनाने केलेल्या घरतोडीच्या कारवाईविरोधात त्यांनी आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. एका सभेत बोलताना जलील म्हणाले होते, “आम्ही हा लढा कायदेशीररित्या लढू. पक्ष मतीन यांना त्याच जागी यापेक्षा मोठे आणि चांगले घर बांधून देईल.”
इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया समोर
या संपूर्ण प्रकरणावर सध्या सौदी अरेबियात हज यात्रेसाठी गेलेले इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे नाव आरोपपत्रात आल्याची मला कल्पना नाही. पण मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी आधीच मान्य केले आहे की मी त्या मुलीच्या (निदाच्या) कुटुंबाला भेटलो होतो आणि जे मला योग्य वाटते, त्यासाठी माझा लढा सुरूच राहील.” दुसरीकडे, मतीन पटेल यांचे वकील अभयसिंह भोसले यांनी सांगितले की, “जलील हे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याने पटेल यांनी त्यांचे नाव घेतले असावे. यात कोणताही कट नाही, याला केवळ राजकीय रंग दिला जात आहे.”






