- केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; वैध प्रस्ताव अथवा ठराव अद्याप प्राप्त नाहीत
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये करण्यात आलेल्या विविध बदलांच्या समर्थनार्थ आवश्यक असणारे कायदेशीर प्रस्ताव आणि अधिकृत कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना पत्राद्वारे दिले आहेत. पक्षाने केलेल्या घटनादुरुस्तीबाबत आयोगाकडे वैध पुरावे प्राप्त झाले नसल्याने यासंदर्भात स्पष्टीकरण आणि दस्तऐवज सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने २७ जुलै रोजी पाठवलेल्या या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. आयोगाच्या नोंदींनुसार, पक्षाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय अधिवेशनात पारित केलेल्या ठरावामध्ये कलम १८ (१) मध्ये दुरुस्ती करण्याचा उल्लेख केला होता. मात्र, प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान पक्षाने या एका कलमातच नव्हे, तर पक्षाच्या घटनेतील कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ या अत्यंत महत्त्वाच्या कलमांमध्येही बदल केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. (Sunetra Pawar)
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सोमवार ३ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. निवडक महत्त्वाच्या विधेयकांवर संसदेत चर्चा ...
या अतिरिक्त कलमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांना किंवा दुरुस्त्यांना पक्षाच्या अधिकृत मंचावर मान्यता देणारे कोणतेही वैध प्रस्ताव अथवा ठराव आयोगाकडे जमा करण्यात आलेले नाहीत. कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाला आपल्या घटनेत बदल करायचे असल्यास त्याबाबतचे रीतसर ठराव, बैठकांची इतिवृत्ते आणि इतर समर्थनार्थ दस्तऐवज निवडणूक आयोगाला सादर करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते. (Sunetra Pawar)
सिंधुदुर्ग : "चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आयुष्यभर समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी ...
पक्षाच्या रचनेबाबत मागवली माहिती :
निवडणूक आयोगाने या पत्राद्वारे पक्षाच्या रचनेबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. यात कलम ६ अंतर्गत राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीची माहिती, कलम ७ अंतर्गत प्राथमिक सदस्यत्वाची नियमावली आणि कलम १२ अंतर्गत राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी व पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय कलम ३२ आणि ३६ बाबतचीही आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर, पक्षाला आता या सर्व घटनात्मक बदलांचे कायदेशीर पुरावे आणि स्पष्टीकरण लवकरात लवकर आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत. (Sunetra Pawar)






