- महापालिकेच्यावतीने १० टन वजनी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या अवशेषांचे पर्यावरण पुरक वैद्यानिक पध्दतीने विघटन करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार पीओपीच्या मूर्तींच्या अवशेषांचे विघटन करण्यासाठी सुमारे १० टन वजनी विसर्जित मुर्तींवर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी अकर्मा फाऊंडेशन या संस्थेची निवडकरण्यात आली आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून नाशिक येथे ३५० टन पेक्षा अधिक पीओपी गणेश मूर्तींवर प्रक्रिया केली जात आहे. (POP's Immersed Idols)
- उपमहापौर संजय घाडी, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांसंदर्भात आयुक्तांची भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) येत्या १० जून २०२६ पासून प्रत्येक ...
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारुकांड प्रकरणातील आरोपींना तपासासाठी फुगेवाडी येथे आणण्यात आल्यानंतर परिसरात ...
सेवा भावी संस्था अकर्मा फाऊंडेशन यांना याप्रकारे विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन प्रकल्प करण्याचा अनुभव आहे. नाशिक येथे त्यांचे प्रक्रिया केंद्र आहे. तेथे त्यांनी आतापर्यंत वजनी ३५० टन पेक्षा जास्त मूर्तींवर याप्रकारे प्रक्रिया केली आहे. अकर्मा फाऊंडेशन यांनी विसर्जित पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे पर्यावरणपूरक वैज्ञानिक पद्धतीने विघटन, पुर्नप्रक्रिया व पुर्नवापर उत्पादन कसे केले जाते याचे सादरीकरण अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या दालनात दिले. हे काम पार पाडण्याचा अनुभव असल्यामुळे एकूण मूर्ती अवशेष साहित्यापैकी सुमारे १० टन वजनी साहित्याचे काम प्रायोगिक प्रकल्प तत्वावर करण्याचे आदेश अति. आयुक्त (शहर) यांच्या मंजुरीनुसार देण्यात आले असल्याचेही पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे. यासाठी सुमारे २० लाख ४४ हजार रुपये या प्रायोगिक तत्वावर प्रकल्पासाठी खर्च केले जाणार आहेत. (POP's Immersed Idols)




