- गाळ उपसा, नालेस्वच्छता कामांची केली पाहणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्वंकष आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. विशेषतः परिमंडळ ५ मधील विविध नाले, कल्व्हर्ट मधील गाळ उपशाची कामे तसेच जलनिसारण व्यवस्थेची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले. पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखल भागांचा आढावा घेऊन तेथील उदंचन पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावेत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशदेखील महापौर तावडे यांनी दिले. (Drain Cleaning BMC News)
- पिवळा बहाव्याची करणार लागवड मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका तसेच ऐरोली नाका या दोन्ही परिसरात ...
स्थानिक नगरसेवक महादेव शिवगण, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा सदाफुले, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते. वाशी नाका नाल्याची पाहणी करताना तरंगता कचरा अडविण्यासाठी वापरात असलेले ट्रॅश बूम, कन्व्हेयर बेल्ट यासह उपयोगात येणारे संयंत्र कसे प्रभावीपणे हाताळले जाते, त्याचीही माहिती महापौरांनी घेतली. (Drain Cleaning BMC News)
परिमंडळ ५ मध्ये नालेस्वच्छता कामे कंत्राटदार नियुक्तीमधील अडचणीमुळे संथ गतीने सुरू होती. प्रारंभी नियुक्त कंत्राटदाराकडून अपेक्षित गतीने काम पूर्ण न झाल्याने त्याच्या जागी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी लागली. परिणामी, कालापव्यय झाला. तरीही, आता नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांना वेग आल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे. यंदा पावसाचे आगमन निर्धारित वेळेनंतर होणार असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यातही नाल्यांमधील गाळ तसेच तरंगता कचरा काढण्याची कामे सुरू ठेवावीत. गाळ काढण्याची कार्यवाही अधिक वेगाने करण्यासाठी परिमंडळ ५ मध्ये आवश्यकता असेल तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे स्पष्ट निर्देश महापौर तावडे यांनी दिले. (Drain Cleaning BMC News)
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारुकांड प्रकरणातील आरोपींना तपासासाठी फुगेवाडी येथे आणण्यात आल्यानंतर परिसरात ...





