Saturday, May 30, 2026

साप्ताहिक भविष्य, ३१ मे २०२६ ते ६ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, ३१ मे २०२६ ते ६ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, ३१ मे २०२६ ते ६ जून २०२६

अनुकूल परिस्थितीचा लाभ

मेष : या आठवड्यात ग्रहमानाचा साथीमुळे भाग्य आपल्याबरोबर असेल. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल व्यवसाय धंद्यात तसेच नोकरी अनुकूलते चा लाभ मिळेल.नोकरीत पदोन्नती किंवा वेतन वृद्धि सारख्या घटना घडू शकतात. वरिष्ठ आपल्या कामावरती खुश असतील. हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात नवीन खरेदी होईल. राहत्या घरासाठी अथवा घराच्या सुशोभीकरणासाठी मुक्त हस्ते खर्च करू शकाल आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. सहकुटुंब सहपरिवार तसेच मित्र मंडळ यांच्या समवेत लहान-मोठ्या प्रवासाचे बेत आखाल. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल.

अनेकानेक मार्गांनी धनलाभ होईल

वृषभ : आर्थिक आवक मनासारखी राहील. अनेकानेक मार्गांनी धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहून आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवनसाथी चे अपेक्षित सहकार्य लाभेल भावंडांच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल व्यवसाय धंद्यात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरून स्पर्धकांवर यशस्वीपणे मात कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश लावून आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. कलाकार खेळाडू साहित्य क्षेत्रातील जातकांना सुसंधी लाभून लाभाची शक्यता. नव्या ओळखीने कामे मिळतील तसेच आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

नवीन करारांची शक्यता

मिथुन : जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल नवीन ठिकाणी गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. इतरांच्या गोड बोलण्याला फसू नका. नुकसान होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. उलाढाल वाढेल. नवीन करारांची शक्यता. व्यवसायिक जुनी नाती नव्याने स्थापित होतील त्याचा आपल्या व्यवसायासाठी सकारात्मक उपयोग होईल. कौटुंबिक परिस्थिती चांगली राहील. मतभेद संपुष्टात येतील. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. सरकारी नोकरीत नवीन कार्यभार बदली सह स्विकारावा लागण्याची शक्यता मात्र कार्यकक्षा रुंदावतील तसेच अधिकारांमध्ये ही वाढ होईल.  

दूरचे प्रवास घडू शकतात

कर्क : पर्यटन देवदर्शन या निमित्य जवळचे तसेच दूरचे प्रवास घडू शकतात अनुकूल वातावरणात प्रवास होईल तसेच धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. समाधान लाभेल. मन धार्मिकता तसेच अध्यात्मामध्ये रमेल. जुनी मित्रमंडळी भेटल्यामुळे वेळ आनंदात जाईल जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केल्यास त्याचा फायदा होईल तसेच इतरत्र वेळ वाया घालवू नये. गुरुजन व कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. उच्च शिक्षणाविषयी निर्णय होतील. भावंडं कडून मदत करू शकते नोकरीत पदोन्नती साठी प्रयत्न करण्यास अनुकूल कालावधी. मात्र राजकारण व गटबाजी पासून दूर राहणे हिताचे ठरेल सरकारी नोकरीत लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहणे आवश्यक आहे.  

मरगळ दूर झटकली जाईल

सिंह : या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण अनुकूल घटना घडल्यामुळे आश्चर्यचकित व्हाल दीर्घकालीन रखडलेली कामे अचानक रित्या पूर्ण होऊ शकतात.काही महत्त्वाच्या सामाजिक कार्यक्रमासाठी बोलावणे, निमंत्रणे येतील. एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळेल. व्यवसाय वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल आत्तापर्यंत आलेली मरगळ दूर झटकली जाईल.भागीदारी व्यवसायात भागीदाराचे प्रयत्न यशस्वी ठरून व्यवसायास नवीन दिशा देण्यात यश लाभेल. मात्र स्पर्धकांवर लक्ष ठेवावे लागेल. कौटुंबिक सुख मिळेल महत्त्वाच्या कार्यात जीवनसाथी चा सल्ला अनमोल ठरेल.कुटुंबात सुवार्ता मिळतील. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होती काहींना प्रवासाचे योग. प्रवास कार्य सिद्ध राहतील.

प्रयत्नांना यश मिळेल

कन्या : घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्यांचा विचार करावा लागेल. जीवन साथी चे मत विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल व्यवसायात संपन्नता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील नवीन तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना यांचा वापर करून व्यवसायास सकारात्मक स्वरूप द्यावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळणे हितकारक ठरेल तसेच कोणाविषयी ही शेरेबाजी टाळा. मित्रमंडळींच्या सल्ल्याचा उपयोग होईल. स्थावर संपत्ती विषयक वाद-विवाद शमतील. मात्र बोलताना आपल्या बोलल्यावर तसंच वर्तणुकीवर ती नियंत्रण आवश्यक आहे. इतरांना आपण अपमानास्पद वागणूक देण्याचे टाळा.

अतिआत्मविश्वास टाळा

तूळ : स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरेल सकस, सात्विक आहार घेणे आरोग्यासाठी आवश्यक ठरेल. महत्त्वाच्या कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.कोणतेही लहान-मोठ्या कामाबद्दल चे निर्णय नीट विचार करून शांतपणे घेणे आवश्यक आहे घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात त्यामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी येतील थोडा संयम बाळगा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील मात्र जीवनसाथीची मर्जी सांभाळावी लागेल. खर्चाचे प्रमाणात वाढ होऊ शकते व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील. इतरांच्या कोणत्याही लहान मोठ्या भानगडीत न पडलेले उत्तम राहील अनावश्यक मध्यस्थी नुकसान कारक ठरू शकते शिवाय बदनामीचे भय राहील प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक आहे. अतिआत्मविश्वास टाळा.

महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील

वृश्चिक : व्यवसाय धंद्यात स्पर्धकांवर ती मात करू शकाल नवीन संकल्पना तसेच व्यवसायात पोषक बदल करून व्यवसाय वाढवता येऊ शकतो. व्यवसाय धंद्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत महत्त्वाचे ठरेल जुनी येणी वसूल झाल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आपल्याला आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास यश मिळेल. कौटुंबिक परिस्थिती समाधान कारक राहील मात्र लहान-मोठ्या प्रसंगामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या विशेषतः जीवन साथी चा गैरसमज होऊ शकतो. कुटुंबातील मुला-मुलींना यश मिळेल.

मानसिकता सुधारेल

धनु : या आठवड्यात अचानक खर्चामध्ये झालेली वाढ व पाहुण्यांचे अचानक झालेले आगमन चकित करेल. अनावश्यक खर्च टाळा. पाहुण्यांसाठी वेळ काढावा लागेल व खर्च करावा लागेल. मात्र मानसिकता सुधारेल महिलावर्गाची धावपळ राहील.आर्थिक आवक सामान्य राहील नोकरीमध्ये अनुकूल वातावरणाचा लाभ मिळू शकतो. मात्र बदलीची शक्यता आहे . नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल घडून स्थानात ही परिवर्तन होऊ शकते. काही वेळेस मना विरुद्ध निर्णय पत्करावे लागतात. याची प्रचिती येऊ शकते वरिष्ठांशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. नवीन नोकरीच्या शोधात आपण जर असाल तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास हरकत नाही. यश मिळू शकते.इतरांच्या मताला प्राधान्य द्या.  

व्यवसायिक परिस्थिती मजबूत राहील

मकर : व्यवसाय धंद्यात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल व्यवसायिक परिस्थिती मजबूत राहील. मात्र स्पर्धक कधीकधी डोईजड होऊ शकतात त्यांच्या हालचालींवर लक्ष असावयास हवे आर्थिक येणी आल्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मनासारखा खर्च करता येईल. कुटुंबात किंवा आपल्या कार्यक्षेत्र आपली मते इतरांवर लादू नका. मित्रमंडळींच्या वर्तुळात तसेच आप्तेष्ठ नातेवाईकांच्या मध्ये व कुटुंबात सुद्धा लहान-सहान गोष्टींवरून वाद-विवाद घडण्याची शक्यता. कलह अदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. नात्यांना महत्त्व द्या तसेच अनावश्यक खर्चाला कात्री लावा. नोकरीत अर्थलाभ होईल. तसेच नोकरीतील परिस्थिती अनुकूल राहील मात्र वरिष्ठांना बरोबर असलेले संबंध अथवा मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.

मनोरंजनाकडे कल राहील

कुंभ : कुटुंब परिवारात काही महत्त्वाच्या घटनांमध्ये निर्णय घेण्यासाठी आपल्या जीवन साथी चा सल्ला आपल्याला उपयोगी ठरेल. त्यामुळे निर्णय अचूक होऊन त्याचा भविष्यात उपयोग होईल. आर्थिक परिस्थिती समाधान कारक राहील .व्यवसाय धंदा चांगला चालेल. नफ्यात वाढ होईल. नवीन संकल्पना यशस्वी ठरून व्यवसायास एक नवीन दिशा देण्यात यशस्वी ठराल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील तसेच सुसंगती आणि व्यसने यापासून अलिप्त रहा. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. मनोरंजनाकडे कल राहील कौटुंबिक सुख मिळेल ात्र कुटुंबातील वडीलधार्‍या माणसांचा मान राखा.काही महत्त्वाच्या कामांसाठी खर्च करावा लागू शकतो.प्रवासाचे योग.

प्रगती कारक वार्ता समजतील

मीन : अनुकूल ग्रह मनामुळे काही चांगल्या घटना घडल्यामुळे मन प्रसन्न राहील उत्साहात भर पडेल तसेच कौटुंबिक सुख मिळून कुटुंबातील मुलांकडून त्यांच्या प्रगती कारक वार्ता कानी आल्यामुळे सुखावून जाल.नोकरीत अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच वेतन वृद्धि सह पदोन्नती मिळू शकते. जीवनसाथी मनासारखी साथ देईल. प्रेमात यश मिळू शकते. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असाल तर त्यादृष्टीने प्रयत्न करा अनुकूल कालावधी असल्यामुळे प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे ताणतणाव रहित वातावरणाचा लाभ मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील तसेच पल्या सहकार्‍यांवर विनाकारण राग काढू नका.व्यवसाय धंद्यात लहान मोठ्या कामासाठी प्रवास करावा लागेल प्रवास कार्य सिद्ध राहतील.
Comments
Add Comment