कोल्हापूर : चित्रपट अभिनेता, निर्माता रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर राज्यभरातील प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आज अभिनेता रितेश देशमुख यांनी सपत्नीक करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शन घेऊन मनोभावी पूजा केली, यावेळी वडील स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच कोल्हापूरकरांनी मलाही प्रेम दिलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष ...
'राजा शिवाजी' चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिल्यानंतर प्रेक्षकांचे अभिनेता रितेश देशमुखनं आभार मानले. अंबाबाई देवीच्या आशीर्वादानेच आपण पुढं जातो त्यामुळे दर्शन घ्यावच लागतं, मंदिरात आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जयघोष ऐकायला मिळतो यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते, मराठी चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो, तेव्हा वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतात, प्रत्येक विभागाची आपुलकी वेगळी आहे, कोल्हापूरकरांचे प्रेम माझ्या वडिलांनाही लाभलं आणि मलाही लाभत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक जी आपुलकी दाखवतात त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला आशीर्वाद देतं असल्याचेही या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता रितेश देशमुखनं यावेळी म्हटलं.






