Thursday, May 7, 2026

Corporator Diksha Karkar : शिवसेना नगरसेविका चक्क गटारात उतरली

Corporator Diksha Karkar : शिवसेना नगरसेविका चक्क गटारात उतरली

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली असून महापौर, उपमहापौरांसह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे आपल्या स्तरावर नाल्यांच्या सफाईची पाहणी करत आहेत. तसेच प्रत्येक नगरसेवकही आपल्या प्रभागातील नाल्याची पाहणी करून सफाईच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत. पण या पाहणीमध्ये दहिसरमधील नगरसेविका आणि विधी व महसूल समितीच्या अध्यक्षा दीक्षा हर्षद कारकर यांनी तर चक्क नाल्यात उतरतून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या अनोख्या पध्दतीने केलेल्या पाहणीच्या कामाची विभागातील जनता दाद देत आहेत.

मुंबई महापालिकेच्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक ६मधील नवनिर्वाचित शिवसेना नगरसेविका आणि विधी व महसूल समिती अध्यक्षा दीक्षा हर्षद कारकर यांनी दहिसरमधील पूर्व येथील मानव कल्याण येथील नाल्यामध्ये उतरून नालेसफाई ची पाहणी केली. या प्रभागातील हा महत्वाचा नाला आहे, ज्यामध्ये योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून दीक्षा कारकर यांनी रस्त्याच्या खाली असलेल्या दहा ते फुट खाेल नाल्यात शिडीद्वारे उतरून कामगार कशाप्रकारे गाळ काढतात आणि आतील बाजुस किती गाळ आहे तो कसा काढला गेला पाहिजे याची पाहणी केली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

दिक्षा कारकर यांनी माजी नगरसेवक स्वर्गीय प्रकाश कारकर यांच्या सूनबाई असून कारकर हे सुध्दा प्रत्यक्ष गटारात उतरून नालेसफाईच्या कामाची पाहणी करायचे. हीच कार्यपद्धती पुढे नेत माजी विधी व महसूल समिती अध्यक्ष हर्षद कारकर हेसुध्दा नालेसफाई पाहणी नाल्यात उत्तरून करायचे, त्यानुसार आता विद्यमान नगरसेविका दीक्षा हर्षद कारकर यांनीही हीच प्रथा पुढे कायम ठेवत थेट नाल्यात उतरुन पाहणी केली आहे. प्रभागाची जबाबदारी हेच आमचे ध्येय आहे. प्रभागात तळागाळात जावून काम करायची परंपरा आजही मी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment