Friday, July 17, 2026

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM...

कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता फक्त भावना व्यक्त करत नाहीत, तर आपल्या Personality, Mood आणि Communication Style चीही ओळख बनले आहेत.     मोठ्याने रडणारा चेहरा हा इमोजी फक्त रडण्यासाठी नाही! हा इमोजी आता दुःखापेक्षा Funny Moments, Stress, Overthinking किंवा "बस, आता काही होत नाही!" अशा भावना व्यक्त करण्यासाठी जास्त वापरला जातो. एकाच इमोजीत Drama आणि Humour दोन्ही दिसून येतात.     आनंदाश्रूंनी हसणारा चेहरा Old is Gold! हा Classic Laugh इमोजी आजही तितकाच Popular आहे. एखादा Joke, Reel किंवा Meme पाहिल्यानंतर मनापासून हसू आलं, तर हा इमोजी आजही पहिली पसंती ठरतो.     फायर एकच इमोजी... आणि Full Compliment! कोणाचा Look, Outfit, Photo, Dance किंवा Performance आवडला की हा इमोजी वापरला जातो. "तू भन्नाट आहेस!" हे सांगण्याचा हा सर्वात Quick मार्ग बनला आहे.     लाल हृदय प्रेम आणि आपुलकीचं Evergreen Symbol Love, Friendship, Support किंवा Care... कोणतीही भावना व्यक्त करायची असेल तर हा इमोजी आजही सर्वाधिक वापरला जातो. शब्द कमी पडले तरी हा इमोजी पुरेसा ठरतो.     लोळून हसणारा चेहरा जेव्हा हसण्याचा इमोजी कमी पडतो! एखादी गोष्ट इतकी Funny वाटते की अक्षरशः लोळून हसायला होतं, तेव्हा हा इमोजी वापरला जातो. हा Emoji Extra Reaction देण्यासाठी Perfect मानला जातो.     हृदयांसह हसरा चेहरा Soft Feelings व्यक्त करणारा Emoji कोणाचं Sweet Message, Appreciation किंवा Care मिळाल्यावर हा वापरला जातो. हा इमोजी शांत, प्रेमळ आणि Positive Vibes देणारा मानला जातो.     जोडलेले हात Thank You, Prayer आणि Respect... सगळं एका इमोजीत! हा इमोजी धन्यवाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, प्रार्थना व्यक्त करण्यासाठी किंवा आदर दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. भारतीयांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे.     विचार करणारा चेहरा "खरंच?" असा Question करणारा इमोजी एखादी News, Post किंवा माहिती संशयास्पद वाटली, किंवा थोडा Sarcasm व्यक्त करायचा असेल, तर हा इमोजी लगेच वापरला जातो.     पार्टी पॉपर प्रत्येक छोट्या-मोठ्या Success साठी Celebration! Birthday, Promotion, Result, Achievement किंवा छोटासा Win... प्रत्येक आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी हा इमोजी वापरला जातो.     डोळे "सगळं पाहतोय... पण काही बोलत नाही!" Social Media वरील Gossip, Drama किंवा Viral Post पाहताना हा इमोजी वापरला जातो. शांतपणे Observe करत असल्याचं तो दाखवतो.    
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >