मुंबई : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम येथील शितल तलावात (Sheetal Talao) शुक्रवारी (१७ जुलै) एका १९ वर्षीय तरुण बुडाल्याची (Drowning) घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire Brigade - MFB), पोलीस (Police), १०८ रुग्णवाहिका (108 Ambulance), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (National Disaster Response Force - NDRF) तसेच पालिका (Ward Staff) प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास प्रकल्पअंतर्गत देण्याचा प्रस्तावाला ...
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी सकाळी ११:४९ वाजता कुर्ला (पश्चिम) येथील एल.बी.एस. रोड (L.B.S. Road) लगत असलेल्या शितल तलावात (Sheetal Talao) एक मुलगा बुडाल्याची माहिती प्राप्त झाली.
दुपारी १:१७ वाजेपर्यंत मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, संबंधित तरुणाची ओळख आदित्य दिलीप तयाडे (Aditya Dilip Tayade, 19) अशी झाली आहे. सध्या त्याचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम (Search Operation) सुरू असून, मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) विनंतीनुसार एनडीआरएफचे (NDRF) पथकही तैनात करण्यात आले आहे.





