रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले
पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान
सावंतवाडी : सावंतवाडी शहराला काल मध्यरात्री १२ च्या सुमारास भीषण वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळाने शहरातील अनेक भागांत मोठे नुकसान केले असून, झाडे कोसळणे, इमारतींवरील पत्रे उडणे अशा घटनांमुळे मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील हवामान विचित्र होत चालला आहे, कधी कडाक्याचं ऊन तर कधी पाऊस, ऋतुचक्र बिघडत आहे आणि याचा परिणाम म्हणून उष्माघात यांसारखे त्रास ...
मुंबई : उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे कोकणकर आपल्या गावी जाण्यासाठी निघालेत. अनेक एक्सप्रेस गाड्या दादर, दिवा, सीएसएमटी स्थानकापासून सुटत आहेत. परंतु ...
विद्युत पुरवठा खंडित, शहरात अंधाराचे साम्राज्य
गुरुवारी सायंकाळपासूनच तालुक्यात विजांचा लखलखाट सुरू होता आणि आंबोली परिसरात पावसाने हजेरी लावली होती. रात्री १२ वाजता जेव्हा वादळ सुरू झाले, तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून आणि तांत्रिक बिघाडामुळे शहराचा विद्युत पुरवठा सुमारे २ तास खंडित झाला होता.
ठिकठिकाणी पडझड आणि नुकसान
राजवाडा व शिव उद्यान: राजवाडा येथील नारळाचे झाड कोसळून संरक्षक कठड्याचे नुकसान झाले, तर शिव उद्यानातील झाडे पडल्याने सौंदर्यीकरणाला धक्का बसला आहे.
उभाबाजार: येथील एका घरावरील पत्रा उडून शेजारील अंगणात पडला. जाहिरात कमानी: आरपीडी परिसरातील जाहिरात कमानीही वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.
मोठा अनर्थ टळला
हे वादळ रात्रीच्या वेळी आले आणि रस्त्यावर वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शहरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सकाळी उशिरापर्यंत पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू होते.






