पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रथमच संवाद झाला आहे.
शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी ...
भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी सांगितले की, भारत-अमेरिका संबंध मजबूत पायावर उभे आहेत. ट्रम्प यांनी मोदींना, “आम्हाला तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे,” असे म्हंटल्याचे सर्जियो गोर यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर ही पहिलीच चर्चा आहे. दोन्ही नेत्यांनी होर्मुज जलडमरूमध्यावरील परिस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित केले, जो सध्या मध्यपूर्वेतील तणावाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, होर्मुज परिसरात इराणी नौदलाच्या जहाजांवर कारवाई करण्यात आली असून तेथील बारूदी सापळे हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.





