Wednesday, April 8, 2026

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात तो 'ॲटली'सोबत काम करणार आहे, तर यावेळी त्याच्यासोबत लेडी सुपरस्टार दीपिका पादुकोण (Deepika Padukone) मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा हा सिनेमा जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरणार याचा पुरावा, 'राका'चं (RAAKA) पोस्टर पाहूनच मिळतोय.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आता या आगामी सिनेमाला 'राका' हे नाव मिळालं असून यासोबतच अभिनेत्याचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनचा हा जबरदस्त लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सन पिक्चर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलंय की, "AA22xA6 आता RAAKA आहे. स्वतःला अशा एका जगासाठी तयार करा जे सर्व सीमांपलीकडे आहे..." ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अल्लू अर्जुनचा लूक रिलीज केल्यानंतर काही मिनिटांतच या पोस्टला २.५२ लाखांहून अधिक लाईक्स आणि ८,००० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

'राका'च्या टायटल पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा क्लोज-अप लूक दाखवण्यात आला असून डोक्यावर अर्धवट दिसणारे केस, मोठी टोकदार नखं आणि प्राण्यासारख्या पंजांनी झाकलेला अर्धा चेहरा, त्यातून घाबरवणाऱ्या काळ्या डोळ्यांसह दाट मिशा, असा त्याचा लूक आहे. विशेषतः त्यांची तीक्ष्ण नजर आणि डोक्यावरचं टक्कल त्यांच्या पात्राला अधिक गूढ आणि दमदार बनवतंय.

अल्लू अर्जुनचा नव्या सिनेमातला लूक 'राका' सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच वर्षभरापूर्वी आलेल्या सिनेमात 'पुष्पा' साकारुन अल्लू अर्जुननं सर्वांना वेड लावलेलं. अशातच आता 'राका' साकारून अल्लू अर्जुन प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा आपल्या दमदार भूमिकेची छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या या जबरदस्त लूकची एकच चर्चा होत असून हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.J

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >