Saturday, February 28, 2026

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती, उपसभापतींची निवड

अलिबाग : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सुचनेनुसार सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची बैठक १२ मार्चला दुपारी २ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात पीठासीन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती होत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी यांनी दिली.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी १२ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारांना आपापले उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे दाखल करता येणार आहेत, तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीची निवडीची बैठक १२ मार्च रोजी दुपारी २ आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला सुरुवात होताच पिठासीन अधिकाऱ्यांकडे दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १० मिनीटांनी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यातील १५ तालुका पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी तालुकास्तरावर ११ मार्च रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समित्यांच्या सभागृहात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या आहेत. सुधागड पंचायत समितीसाठी तहसीलदार उत्तम कुंभार, पेण पंचायत समितीसाठी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, उरण पंचायत समितीसाठी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, अलिबाग पंचायत समितीसाठी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, मुरुड पंचायत समितीसाठी मुरुडचे तहसीलदार आदेश डफळ, रोहा पंचायत समितीसाठी रोह्याचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तळा पंचायत समितीसाठी तळा तहसीलदार स्वाती पाटील, माणगाव पंचायत समितीसाठी माणगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, म्हसळा पंचायत समितीसाठी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे, श्रीवर्धन पंचायत समितीसाठी श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, महाड पंचायत समितीसाठी महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे आणि पोलादपूर पंचायत समितीसाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांची नियुक्ती केली गेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >