Saturday, February 28, 2026

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती
मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले होते. बीसीसीआय २६ मार्च ते ३१ मे या कालावधीत आयपीएल २०२६ चे आयोजन करणार होते. पण आता आयपीएल किमान दोन ते तीन दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आयपीएल २८ किंवा २९ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अद्याप आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलेले नाही. यामुळे आयपीएलवरुन फक्त चर्चा सुरू आहे. भारतात तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. यामुळे निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याचा अंदाज घेण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. सध्या क्रिकेटप्रेमींच्या वर्तुळात आयपीएल कोणत्या दिवसापासून सुरू होणार यावरून चर्चा सुरू आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे अनेक क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
Comments
Add Comment