Monday, February 9, 2026

आयटेलकडून मिलिटरी ग्रेड असलेला आकर्षक स्‍मार्टफोन ए१०० लाँच

आयटेलकडून मिलिटरी ग्रेड असलेला आकर्षक स्‍मार्टफोन ए१०० लाँच

मुंबई : आयटेल या भारतातील आघाडीच्‍या टेक ब्रँडने नुकतेच ब्‍लॉकबस्‍टर व डिझाइनर ए१०० स्‍मार्टफोन लाँच केला आहे. प्रत्‍येकाचे लक्ष वेधून घेणारी डिझाइन असलेला हा स्‍मार्टफोन टिकाऊपणा व किफायतशीरपणासंदर्भात आघाडीवर आहे. ए१०० स्‍मार्टफोनमध्‍ये मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन (एमआयएल-एसटीडी-८१०एच) आहे, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना अद्वितीय टिकाऊपणा व मन:शांती मिळते. अल्‍ट्रालिंक असलेला हा स्‍मार्टफोन नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटी नसलेल्‍या ठिकाणी देखील कनेक्‍टीव्‍हीटी देतो. ए१०० स्‍मार्टफोन ६४ जीबी रॉमसह (३+५*) जीबी व (४+८*) जीबी या दोन रॅम व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

११ कोटींहून अधिक ग्राहक, १.३ लाखांहून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये रिटेल उपस्थिती आणि १००० हून अधिक सर्विस सेंटर्ससह आयटेल भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड आहे. किंमत फक्‍त ६७९९ रूपये (३ जीबी व्‍हेरिएण्‍ट) आणि ७४९९ रूपये (४ जीबी व्‍हेरिएण्‍ट) असलेला हा स्‍मार्टफोन भारतभरातील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. या स्‍मार्टफोनवर १०० दिवसांमध्‍ये मोफत स्क्रिन रिप्‍लेसमेंट ऑफर देखील देण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे भारतात फक्‍त आयटेलकडून देण्‍यात येणाऱ्या अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, ''भारतातील अधिकाधिक ग्राहकांसाठी स्‍मार्टफोन गरजेचा बनला आहे, जो दीर्घकाळापर्यंत कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. ए१०० सह आम्‍ही वापरकर्त्‍यांच्‍या सर्वाधिक व महत्त्वपूर्ण गरजेवर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्‍हणजे दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहणारा, आकर्षक डिझाइन असलेला, तसेच किफायतशीर असलेला स्‍मार्टफोन. वैशिष्‍ट्ये जसे मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा आणि अल्‍ट्रालिंक व्‍यावहारिक नाविन्‍यतेमध्‍ये सामावलेले आहेत, जी आयटेलची खासियत आहे. जागतिक स्‍तरावर रॅम/रॉम किमतींमध्‍ये वाढ झालेली असताना देखील आम्‍ही आमचे डिवाईसेस भारतसाठी किफायतशीर दरांमध्‍ये उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतली आहे.''

आयटेल ए१०० मध्‍ये आकर्षक ६.६-इंच ९० हर्टझ एचडी+ डिस्‍प्‍ले आहे, ज्‍याला पूरक इमर्सिव्‍ह डीटीएस-समर्थित साऊंड तंत्रज्ञान आहे, जे आकर्षक रंगसंगती, सुस्‍पष्‍ट आवाज व लक्षवेधक व्हिज्‍युअल्‍ससह मधुरमय संगीतचा आनंद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये भर करण्‍यात आलेले सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्‍यांना विनाव्‍यत्‍यय बॅटरी स्‍टेटस, कॉल्‍स, नोटिफिकेशन्‍ससह कनेक्‍टेड ठेवते. फोटोग्राफीप्रेमींना ८ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा आवडेल, ज्‍यामध्‍ये आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करण्‍यासाठी प्रगत इमेज प्रोसेसिंग देखील आहे. ए१०० मध्‍ये आयआर ब्‍लास्‍टर देखील आहे, ज्‍यामुळे दुरून टीव्‍ही, एअर कंडिशनर्स आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक अप्‍लायन्‍सेस सहजपणे नियंत्रित करता येतात.

ऑक्‍टा-कोअर युनिसोक टी७१०० प्रोससरची शक्‍ती आणि अँड्रॉईड १५ गो असलेला ए१०० विनासायास मल्‍टीटास्किंग, सुलभ गेमिंग आणि प्रभावी व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो. सुरक्षितता व सहज उपलब्‍धतेसाठी ए१०० मध्‍ये फेस अनलॉक आणि साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, ज्‍यामधून संरक्षण व सोयीसुविधा मिळतात. विशाल ५००० एमएएच बॅटरी आणि १० वॅट चार्जरसह हा डिवाईस दिसवभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. हा स्‍मार्टफोन सिल्‍क ग्रीन, प्‍युअर ब्‍लॅक आणि टायटॅनियम गोल्‍ड या लक्षवेधक रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

Comments
Add Comment