रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका व्यक्तीची तब्बल ६६ लाख ५४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या घटनेमुळे गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर टोळ्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. (Online Fraud)
https://prahaar.in/2026/05/20/iran-america-war-peace-or-destruction-america-warns-of-direct-war-with-iran-tension-increases-in-the-middle-east/
यानंतर आरोपींनी बनावट ग्राफ, खोटे नफ्याचे स्क्रीनशॉट आणि डेमो दाखवत फिर्यादीचा विश्वास जिंकला. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून मोठा परतावा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे फिर्यादीला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. (Online Fraud)
काही दिवसांनी गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फिर्यादीला संशय आला. आरोपींकडून सतत नवीन पैसे भरण्याची मागणी होत असल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Online Fraud)
https://prahaar.in/2026/05/20/gold-rate-today-gold-price-sees-another-big-jump-increase-of-rs-1310-per-tola-in-a-single-day/
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरून येणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनधिकृत ट्रेडिंग अॅप्सवर विश्वास ठेवू नये आणि जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Online Fraud)