Home ब्रेकिंग न्यूज Iran – America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला

Iran – America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला

0
Iran – America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला
vice president j.d. vance

इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी इराणला थेट इशारा देत, “एकतर शांततेचा मार्ग स्वीकारा, नाहीतर विनाशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,” असा कठोर संदेश दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. (Iran – America War)

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जेडी व्हान्स म्हणाले की, अमेरिका अजूनही राजनैतिक चर्चेद्वारे तोडगा काढण्यास प्राधान्य देत आहे. मात्र, इराणने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवण्याबाबत ठोस हमी दिली नाही, तर अमेरिकेकडे लष्करी कारवाईसह सर्व पर्याय खुले आहेत. (Iran – America War)

https://prahaar.in/2026/05/20/did-22-mlas-from-ajit-pawars-group-meet-sharad-pawar-in-secret/

व्हान्स यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अमेरिकेला मध्यपूर्वेत आणखी युद्ध नको आहे. पण इराणने अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला, तर आम्ही गप्प बसणार नाही.” अमेरिकेची मुख्य अट म्हणजे इराणने भविष्यात अण्वस्त्रे विकसित न करण्याची हमी देणे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Iran – America War)

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने अणुकराराबाबत समाधानकारक निर्णय घेतला नाही, तर “मोठा हल्ला” होऊ शकतो, असा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Iran – America War)

https://prahaar.in/2026/05/20/gold-rate-today-gold-price-sees-another-big-jump-increase-of-rs-1310-per-tola-in-a-single-day/

दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना “नव्या संघर्षाच्या आघाड्या उघडू शकतात” असा इशारा दिला. त्यामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Iran – America War)

या वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल वाहतूक या मार्गातून होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळल्यास ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. (Iran – America War)

https://prahaar.in/2026/05/20/melody-trend-and-parle-shares-melody-trend-reaches-its-peak-parle-shares-rose-in-an-instant-know-what-exactly-happened/

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्यास जागतिक व्यापार, इंधन दर आणि आर्थिक बाजारपेठांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे लागले असून पुढील काही दिवस परिस्थिती अधिक संवेदनशील ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Iran – America War)