Home ब्रेकिंग न्यूज Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची तब्बल ६ तास चौकशी! काय म्हणाल्या चाकणकर…?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची तब्बल ६ तास चौकशी! काय म्हणाल्या चाकणकर…?

0
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची तब्बल ६ तास चौकशी! काय म्हणाल्या चाकणकर…?
Rupali Chakankar

– भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT कडून सवालांचा भडिमार

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) तब्बल सहा तास चौकशी केली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकरांची सविस्तर चौकशी करत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.

अनेक मुद्द्यांवर झाली कसून चौकशी :

अशोक खरातसोबतचे संबंध, पूजाविधी, आर्थिक व्यवहार आणि विविध कार्यक्रमांतील फोटो-व्हिडीओ या सर्व मुद्द्यांवर एसआयटीने रुपाली चाकणकरांना धडाधड प्रश्न विचारले. चौकशीदरम्यान “भोंदू अशोक खरातला केव्हापासून ओळखता?”, “खरातसोबत आर्थिक संबंध होते का?”, “शिवनिका संस्थेतील कामकाज काय होतं?” तसेच “राजकीय नेते मंदिरात कुणाच्या सांगण्यावरून येत होते?” अशा अनेक मुद्द्यांवर त्यांची कसून चौकशी करण्यात आली.

https://prahaar.in/2026/05/11/ipl-2026-mumbai-indians-tilak-varmas-mistake-shattered-mumbais-dream-misunderstanding-with-naman-dhir-turned-the-match-around-mi-out-of-the-playoffs/

याशिवाय अशोक खरातसोबत करण्यात आलेले पूजाविधी, संबंधित फोटो आणि व्हिडीओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील होते, तसेच आर्थिक व्यवहार कोणत्या बँक खात्यांतून झाले याबाबतही माहिती विचारण्यात आली.

चौकशीदरम्यान काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

एसआयटीसमोर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून त्यांनी आध्यात्मिक श्रद्धेपोटी अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरु मानले होते. “माझे आणि अशोक खरातचे कोणतेही आर्थिक संबंध नव्हते. मी कुणालाही त्यांच्याकडे जाण्यासाठी आग्रह केला नाही. खरात यांची दुसरी बाजू मला माहीत नव्हती,” असा दावा त्यांनी चौकशीत केला.

https://prahaar.in/2026/05/10/modis-appeal-at-the-hyderabad-rally-sparks-a-nationwide-stir-fueling-intense-debate-on-social-media/

सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरं दिली : रुपाली चाकणकर

चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक उत्तरं दिली आहेत. तपास यंत्रणेला जे सहकार्य हवं असेल ते मी पूर्णपणे करणार आहे. चौकशी संदर्भातील सविस्तर माहिती अहवालातून समोर येईल.”

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, एसआयटीच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here