Home देश India–Pakistan border High-Alert : श्रीगंगानगरमध्ये हाय-अलर्ट वाढवला; सीमाभागात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक निर्बंध लागू

India–Pakistan border High-Alert : श्रीगंगानगरमध्ये हाय-अलर्ट वाढवला; सीमाभागात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक निर्बंध लागू

0
India–Pakistan border High-Alert : श्रीगंगानगरमध्ये हाय-अलर्ट वाढवला; सीमाभागात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कडक निर्बंध लागू
India–Pakistan border High-Alert

राजस्थान : राजस्थानमधील श्रीगंगानगर (Sri Ganganagar) येथे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट कायम ठेवला असून भारत – पाकिस्तान सीमा लगतच्या (India–Pakistan border) भागात विशेष बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घुसखोरीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

https://prahaar.in/2026/05/11/rupali-chakankar-rupali-chakankar-was-questioned-for-6-hours-what-did-chakankar-say/

जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सीमेलगतच्या ३ किलोमीटर परिसरात १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत रात्रीच्या वेळी सर्व अनावश्यक सार्वजनिक हालचालींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या काळात नागरिकांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार असून सुरक्षा तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस परिसरात उच्च क्षमतेचे दिवे (high-beam lights) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच DJ सिस्टीम, मोठ्या आवाजातील ध्वनीप्रदूषण करणारी साधने आणि सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी लागू असेल. प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्बंधांमुळे सीमाभागात होणाऱ्या संशयास्पद हालचाली लपवता येणार नाहीत आणि सुरक्षा यंत्रणांना योग्य वेळी कारवाई करणे सोपे जाईल.

https://prahaar.in/2026/05/11/ipl-2026-mumbai-indians-tilak-varmas-mistake-shattered-mumbais-dream-misunderstanding-with-naman-dhir-turned-the-match-around-mi-out-of-the-playoffs/

सीमा सुरक्षा दल (BSF) आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यात आला असून गस्त वाढवली गेली आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त चौक्या उभारण्यात आल्या आहेत आणि ड्रोन व तांत्रिक देखरेखीद्वारेही नजर ठेवली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/11/pakistan-shaken-a-horrific-suicide-attack-in-bannu-15-police-personnel-killed-many-injured/

दरम्यान, प्रशासनाने स्थानिक नागरिकांना घाबरून न जाता नियमांचे पालन करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here