मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो अलायन्स ‘Alliance’ च्या पहिल्या पर्वाचा विजेता अखेर जाहीर झाला असून, अभिनेत्री आणि होस्ट मिनी माथुर (Mini Mathur) हिने विजेतेपद पटकावले आहे. मिनीने शानदार खेळ करत ट्रॉफीसह तब्बल ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावावर केले आहे. या स्पर्धेत अली गोनी हा पहिला रनरअप, तर रुही दोसानी दुसरी रनरअप ठरली. (Mini Mathur Wins Alliance)
अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) याच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या या शोचा प्रवास सहा आठवड्यांचा होता. या काळात स्पर्धकांना अनेक कठीण टास्क, रणनीती आणि आव्हानांचा सामना करावा लागला. शोमध्ये कधी मैत्री तर कधी विश्वासघात पाहायला मिळाला. योग्य वेळी घेतलेले निर्णय, नशीब आणि रणनीतीच्या जोरावर स्पर्धकांना टिकून राहावे लागले. (Mini Mathur Wins Alliance)
https://prahaar.in/2026/08/06/rajpal-yadav-major-action-taken-by-the-bank-against-rajpal-yadav-his-assets-are-set-to-be-auctioned-following-a-cheque-bounce-case/
सुरुवातीपासूनच ‘Alliance’ हा एक खडतर आणि अनिश्चित स्पर्धेचा शो म्हणून चर्चेत राहिला. प्रत्येक टप्प्यावर स्पर्धकांना नवीन युती करावी लागली, तर काही वेळा जुन्या साथीदारांविरोधातही खेळावे लागले. (Mini Mathur Wins Alliance)
या शोमध्ये रवी किशन, वंशज सिंह, पायल गेमिंग, अरमान खेरा, डॉली जावेद, डेलबार आर्या, सब्बी सुरी, रिव्हा किशन, कुशल टंडन, डेझी शाह, रुही दोसानी, निखिल चिनापा, नीती टेलर, मिनी माथुर, अरसलान गोनी आणि जैद दरबार यांसारख्या अनेक लोकप्रिय चेहऱ्यांनी सहभाग घेतला होता. शो पुढे जात असताना सोहेल खान, अगु स्टॅन्ली चिडोझी, वृद्धी पाटवा, सीमा सजदेह, अली गोनी, कशिश कपूर आणि बाली यांसारख्या स्पर्धकांचीही एन्ट्री झाली. मात्र, अखेरीस अंतिम फेरीत मिनी माथुर, अली गोनी आणि रुही दोसानी हे तीन स्पर्धक पोहोचले आणि त्यातून मिनीने विजेतेपदावर नाव कोरले. (Mini Mathur Wins Alliance)
https://prahaar.in/2026/08/06/and-the-lock-upp-2-trophy-goes-to-silence-fell-over-the-stage-the-moment-the-name-was-announced/
‘हा प्रवास अविश्वसनीय होता’ : मिनी माथुर
विजयानंतर आनंद व्यक्त करताना मिनी माथुर म्हणाली, “Alliance जिंकणे हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे अविश्वसनीय आहे. या प्रवासाने मला भावनिक, मानसिक आणि रणनीतीच्या पातळीवर अनेक आव्हाने दिली. प्रत्येक दिवसाने मला अधिक मजबूत बनवले.” ती पुढे म्हणाली, “या प्रवासात अनेक चढ-उतार आले. काही सुंदर मैत्री निर्माण झाल्या, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येक सहकारी ‘Ally’ने माझ्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रॉफी जिंकणे ही खास भावना आहे, पण या प्रवासातील आठवणी, नाती आणि शिकवण मी कायम जपून ठेवेन.” (Mini Mathur Wins Alliance)
मिनी माथुरच्या या विजयामुळे ‘Alliance’च्या पहिल्या पर्वाचा थरारक शेवट झाला असून, तिच्या खेळाचे आणि रणनीतीचे सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.