Home ब्रेकिंग न्यूज Deool Band 2 post goes viral : ‘देऊळ बंद 2’ चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

Deool Band 2 post goes viral : ‘देऊळ बंद 2’ चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

0
Deool Band 2 post goes viral : ‘देऊळ बंद 2’ चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल
Deool Band 2

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. असाच एक अत्यंत प्रभावी आणि सुपरहिट ठरणारा चित्रपट म्हणजे ‘देऊळ बंद २’. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेली ७५ दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला आता प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार नाही, कारण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट सिनेमा हॉलमधून काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

https://prahaar.in/2026/08/06/focus-on-traffic-management-in-trimbak-against-the-backdrop-of-shravan/

२१ मे २०२६ रोजी हा चित्रपट मोठ्या उत्साहात चित्रपटगृहात रिलीज झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. चित्रपटाची दमदार कथा, विचार करायला लावणारा आशय आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटात धार्मिक श्रद्धा, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न, ग्रामीण जीवन आणि मानवी नातेसंबंधांचा अत्यंत सुंदर समतोल साधण्यात आला होता. चित्रपट केवळ मनोरंजकच नव्हे, तर प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरला.

https://prahaar.in/2026/08/06/how-much-water-does-the-human-body-need-how-much-should-one-drink-daily-detailed-information/

या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि अनुभवी कलाकारांची फौज झळकली होती. यामध्ये मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, ओम भुतकर आणि मंगेश देसाई यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कथेला अधिक प्रभावी बनवले. प्रत्येक पात्राची वास्तववादी मांडणी प्रेक्षकांना भावली.

https://prahaar.in/2026/08/06/major-tragedy-at-devgads-kunkeshwar-beach-youth-swept-away-and-dies-while-catching-crabs/

चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. या यशस्वी वाटचालीनंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत हा चित्रपट चित्रपटगृहातून काढत असल्याची घोषणा केली.

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “देऊळ बंद २ ला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. आम्ही आता हा सिनेमा सर्व चित्रपटगृहातून काढत आहोत. प्रेक्षकांनी दिलेल्या या अफाट यशाबद्दल आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू.” या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये थोडी निराशा झाली असली, तरी चित्रपटाने गाजवलेल्या सुवर्णकाळाची चर्चा सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here