Home देश PM Narendra Modi : इंडोनेशिया दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाकडे रवाना; लढाऊ विमानांकडून विशेष एस्कॉर्ट

PM Narendra Modi : इंडोनेशिया दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाकडे रवाना; लढाऊ विमानांकडून विशेष एस्कॉर्ट

0
PM Narendra Modi : इंडोनेशिया दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाकडे रवाना; लढाऊ विमानांकडून विशेष एस्कॉर्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडोनेशियातील तीन दिवसांचा अधिकृत दौरा पूर्ण करून बुधवारी जकार्ता येथून ऑस्ट्रेलियाकडे प्रस्थान केले. या वेळी इंडोनेशियन हवाई दलाच्या पाच लढाऊ विमानांनी त्यांच्या विशेष विमानाला इंडोनेशियाच्या हवाई हद्दीबाहेर पडण्यापर्यंत सुरक्षा एस्कॉर्ट दिला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी विमानातूनच लढाऊ विमानांच्या वैमानिकांना अभिवादन केल्याचे दिसून येते. ऑस्ट्रेलियाकडे रवाना होण्यापूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी जकार्ता विमानतळावर स्वतः उपस्थित राहून पंतप्रधान मोदी यांना निरोप दिला.

यापूर्वी, सोमवारी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) इंडोनेशियात दाखल झाले तेव्हाही इंडोनेशियन हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला इंडोनेशियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विशेष एस्कॉर्ट प्रदान केले होते. जकार्ता येथे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. या वेळी दोन्ही नेत्यांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांचाही आस्वाद घेतला.

https://prahaar.in/2026/07/08/decision-on-khan-sirs-anticipatory-bail-on-july-10-patna-civil-court-reserves-verdict/

दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी या भेटीमुळे संरक्षण, सागरी सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण झाल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “इंडोनेशियाचा माझा दौरा पूर्ण करताना आपल्या द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्यासाठी मिळालेल्या सकारात्मक परिणामांमुळे मला अत्यंत समाधान वाटत आहे. इंडोनेशियातील जनतेचे आणि राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल तसेच भारत-इंडोनेशिया संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेबद्दल मी (PM Narendra Modi) त्यांचा ऋणी आहे.

https://prahaar.in/2026/07/07/india-and-indonesia-sign-several-key-agreements-covering-defense-minerals-and-port-development/

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांच्यात मंगळवारी झालेल्या व्यापक चर्चेदरम्यान सुबियांतो यांनी भारत-इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या बैठकीत राजकीय, संरक्षण, आर्थिक, तांत्रिक तसेच प्रादेशिक सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here