Home देश Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; ईडीने ४४० कोटींच्या ठेवी गोठवल्या

Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; ईडीने ४४० कोटींच्या ठेवी गोठवल्या

0
Mamata Banerjee : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; ईडीने ४४० कोटींच्या ठेवी गोठवल्या

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धनशोधन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत कारवाई करत तृणमूल काँग्रेसच्या ४४०.४२ कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही रक्कम पक्षाच्या तीन खासगी बँक खात्यांमध्ये जमा होती. या प्रकरणावर तृणमूल काँग्रेसकडून (Mamata Banerjee) कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

ईडीने मंगळवारी कोलकाता येथे पाच ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये केअरवेल ग्रुप ऑफ कंपनीज तसेच त्यांची विमान चार्टर सेवा चालवणारी कंपनी केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित ठिकाणांचाही समावेश होता. ईडीचा आरोप आहे की, प्राथमिक तपासात एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत तृणमूल काँग्रेसच्या खात्यांमधून सुमारे १६० कोटी रुपये केअरवेल एव्हिएशन आणि तिच्या संबंधित कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले.तपासादरम्यान असेही समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे की, संबंधित कंपनीने २०२३ ते २०२६ या कालावधीत ८२.९६ कोटी रुपये एका नव्याने स्थापन झालेल्या कंपनीकडे वर्ग केले. (Mamata Banerjee)

https://prahaar.in/2026/07/08/pm-narendra-modi-prime-minister-modi-departs-for-australia-after-concluding-his-indonesia-visit-receives-a-special-escort-from-fighter-jets/

ईडीच्या माहितीनुसार, याच निधीपैकी ११२ कोटी रुपयांचा वापर एम्ब्रेयर लेगेसी ६०० या बिझनेस जेटची तसेच ऑगस्टावेस्टलँड १०९एसपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्यासाठी करण्यात आला. एजन्सीचे म्हणणे आहे की, त्यानंतर ही दोन्ही हवाई वाहतूक साधने भाडेतत्त्वावर तृणमूल काँग्रेसला उपलब्ध करून देण्यात आली. (Mamata Banerjee)

यापूर्वी, गेल्या महिन्यात कोलकाता पोलिसांनी पक्षातील बंडखोर आमदारांच्या तक्रारीच्या आधारे या तीन बँक खात्यांमधून रक्कम काढण्यावर निर्बंध घातले होते. या तक्रारीत पक्ष निधीच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. (Mamata Banerjee)

https://prahaar.in/2026/07/08/decision-on-khan-sirs-anticipatory-bail-on-july-10-patna-civil-court-reserves-verdict/

तृणमूल काँग्रेसमध्ये पक्ष निधीवरील नियंत्रणासंदर्भात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला आहे.२ जुलै रोजी कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी गटाच्या याचिकेवर सुनावणी करत संबंधित खासगी बँकांना या खात्यांमध्ये जमा असलेल्या एकूण रकमेचा तपशील न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले होते. (Mamata Banerjee)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here