Home ब्रेकिंग न्यूज Lashkar-e-Taiba : इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार पाडू; लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला उघडी धमकी

Lashkar-e-Taiba : इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार पाडू; लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला उघडी धमकी

0
Lashkar-e-Taiba : इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार पाडू; लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला उघडी धमकी
Lashkar-e-Taiba, pakistan

इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अब्राहम करारा’अंतर्गत पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता द्यावी, असे आवाहन केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने (Lashkar-e-Taiba) पाकिस्तान सरकारलाच थेट धमकी दिली आहे.

लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याने सार्वजनिक सभेत पाकिस्तानचे सर्वोच्च नेतृत्व आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत तीव्र इशारा दिला. “जर पाकिस्तानने इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता दिली, तर सरकार उद्ध्वस्त केले जाईल,” असे भडक वक्तव्य त्याने केले.

https://prahaar.in/2026/05/28/direct-action-against-those-who-play-with-health-33-accused-arrested-in-state-wide-food-and-drug-administration-raids/

सभेत बोलताना सैफुल्लाह (Lashkar-e-Taiba) म्हणाला, “पाकिस्तानच्या दशकांपासूनच्या परराष्ट्र धोरणात बदल करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. जो कोणी इस्रायलला मान्यता देईल, त्याचा विनाश होईल.”

त्याने पुढे दावा केला की, जगातील कोणतीही महासत्ता इस्लामी देशांना इस्रायलला मान्यता देण्यास भाग पाडू शकत नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील वाढत्या संरक्षण सहकार्याचाही त्याने उल्लेख केला. पाकिस्तानची लष्करी ताकद आता इस्रायलच्या प्रभावाला प्रत्युत्तर देऊ शकते, असेही तो म्हणाला. (Lashkar-e-Taiba)

या भाषणात जिहाद, शहादत आणि पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित अनेक भडकाऊ घोषणांचा वापर करण्यात आला. समर्थकांना भडकावणे आणि सरकारविरोधात वातावरण तयार करणे हा या वक्तव्यामागचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. (Lashkar-e-Taiba)

https://prahaar.in/2026/05/28/ukrainian-president-zelensky-arrives-in-sweden-discusses-defense-cooperation-drone-technology/

दरम्यान, या धमक्यांनंतर पाकिस्तानच्या राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. काही सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, लष्कर-ए-तैयबाच्या या वक्तव्यांमागे पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रांची अप्रत्यक्ष रणनीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या वाढत्या दबावाला उत्तर देण्यासाठी किंवा अंतर्गत राजकीय समीकरणे सांभाळण्यासाठी अशा प्रकारचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. (Lashkar-e-Taiba)

अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या ‘अब्राहम करारा’नंतर अनेक अरब देशांनी इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले आहेत. मात्र पाकिस्तानने अद्याप इस्रायलला अधिकृत मान्यता दिलेली नाही. आता या मुद्द्यावरून पाकिस्तानमध्येच संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. (Lashkar-e-Taiba)